जबलपुर येथे सौर उर्जा सिंचन योजनेच्या प्रशिक्षणासाठी शास्त्रज्ञ, कर्मचारी महिला व शेतकरी महिला रवाना …

कोपरगाव प्रतिनिधी(राहुरी विद्यापीठ):-महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे शास्त्रज्ञ व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन योजना या विषयावर तीन दिवसांच्या क्षमता विकास प्रशिक्षणासाठी जबलपुर-मध्यप्रदेश येथे बोरलॉग इंन्स्टिट्युट ऑफ साउथ एशिया (बीसा) या संस्थेत 25 शास्त्रज्ञ, कर्मचारी महिला व 12 शेतकरी महिला असे एकुण 37 प्रशिक्षणार्थींची तिसरी तुकडी रवाना झाली आहे. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्स्टिट्युटचे प्रकल्प समन्वयक […]

Read More

जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही:- विवेक कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी :-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमांतुन त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले असुन तोच वारसा कायम ठेवुन नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन इफको (नविदिल्ली) संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. तालुक्यातील कोपरगांव शिंगणापुर रेल्वेस्टेशन येथे बारा वर्षापासुन बंद झालेला इफको खत […]

Read More

श्री जगन्नाथ रथ यात्रेत सहभागी होतआ.आशुतोष काळेंनी केले पूजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- संपूर्ण देशात धार्मिक सणाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा प्रथमच कोपरगावमध्ये काढण्यात आली होती. या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून श्री भगवान जगन्नाथाचे पूजन करून आशिर्वाद घेतले.ओरिसा राज्यातील जगन्नाथ पुरी येथे मागील कित्येक शतकापासून भगवान श्री जगन्नाथाची रथयात्रा काढली जाते. हा सोहळा साजरा करण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे […]

Read More

सुवर्णभूमी थायलंडवरून आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळेंनी केले स्वागत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- लुम्बीनी बुद्ध विहार कोपरगाव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल व अखिल भारतीय भिक्खु संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्णभूमी थायलंड येथून पु लुअंगपौ विरीयांग सिरिन्धरो यांचे मार्गदर्शन घेऊन आलेल्या भिक्खु संघाचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांचे आशीर्वाद घेतले.सुवर्णभूमी थायलंड येथून पु लुअंगपौ विरीयांग सिरिन्धरो यांचे मार्गदर्शन घेऊन […]

Read More

लाडक्या बहिणींसाठी आ.आशुतोष काळेंची घरपोहोच सेवा, सेतू केंद्रांचा श्वास झाला मोकळा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- महायुती शासनाने महिलांसाठी १ जुलै पासून सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचे अर्ज भरण्यासाठी मागील आठवड्यापासून सेतू केंद्रावर महिला भगिनींची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महिला भगिनींना अर्ज भरण्यासाठी अडचणी येत होत्या. त्या अडचणींची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी संपूर्ण कोपरगाव मतदार संघात सोमवार (दि.०८) पासून आपल्या यंत्रणेमार्फत लाडक्या […]

Read More

माहेगाव देशमुख सेवा सोसायटीच्याअध्यक्षपदी अशोकराव विश्वनाथ काळे व्हा.चेअरमनपदी भरत दाभाडे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अशोकराव विश्वनाथ काळे व उपाध्यक्षपदी भरत बाबुराव दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माहेगाव देशमुख सेवा सहकारी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मधुकर काळे व उपाध्यक्ष यशवंतराव देशमुख यांनी रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अध्यासी […]

Read More

सहकारी पतसंस्थांची थकबाकी वसुली बाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेशजी ओला यांना निवेदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्थांची जंगम जप्ती, स्थावर जप्ती या सारख्या थकबाकी वसुलीसाठी पोलीस संरक्षण मिळत नाही. त्या सहकारी पतसंस्थांना थकबाकी वसुलीसाठी पोलीस बंदोबस्त मिळावे.अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, अहमदनगर जिल्हा स्थैर्य निधी संघ अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक शिवाजी आप्पा कपाळे आदींनी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयात राष्ट्रिय शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या वतीने राष्ट्रिय शैक्षणिक धोरण : २०२० विषयावर कार्यशाळा संपन्न झाल्याची माहिती प्र. प्राचार्य प्रो.बी. बी. भोसले यांनी दिली. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व आळेफाटा महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागप्रमूख डॉ. रमेश भिसे हे […]

Read More

वृक्ष लावणे व संवर्धन करणे अंचनापूर गावच्या वृक्षप्रेमींचे कार्य प्रेरणादायी:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील अंजनापुर या गावाने गेल्या दहा वर्षापासून हजारो वृक्ष आज पर्यंत लावून, त्याला लोखंडी जाळीचे ग्रील करून त्यावर ते झाड लावण्याची तारीख याचा फलक लावून ते वर्षभर टॅंकरने पाणी देऊन जोपासण्याची एक महान आदर्शवत कार्य अंजनापूरचे वृक्षवेध फाउंडेशन च्या वतीने अविरत चालू आहे या वृक्षप्रेमी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे गणपती उत्सवाच्या […]

Read More

वृक्ष लावणे व संवर्धन करणे अंचनापूर गावच्या वृक्षप्रेमींचे कार्य प्रेरणादायी:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील अंजनापुर या गावाने गेल्या दहा वर्षापासून हजारो वृक्ष आज पर्यंत लावून, त्याला लोखंडी जाळीचे ग्रील करून त्यावर ते झाड लावण्याची तारीख याचा फलक लावून ते वर्षभर टॅंकरने पाणी देऊन जोपासण्याची एक महान आदर्शवत कार्य अंजनापूरचे लक्षवेध फाउंडेशन च्या वतीने अविरत चालू आहे या वृक्षप्रेमी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे गणपती उत्सवाच्या […]

Read More