देवळालीच्या विकासाच्या व स्वच्छ प्रशासनाच्या मुद्द्यांवर देवळाली प्रवरा हेल्प टीम नगरपरिषदेची निवडणुक लढवणार:- दत्ता कडु पाटील…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
देवळाली प्रवरा शहराचा नियोजनबध्द विकास करण्यात तसेच मुलभुत सुवीधा उपलब्ध करुन देण्यास सत्तारुढ पक्ष सपशेल अपयशी ठरला आहे.याच सत्तारुढ गटाचे नगरसेवक कोलांट्या उड्या मारुन पुन्हा मतांचा जोगवा मागण्याच्या तयारीत आहेत.अश्या लोकांकडून शहराचा विकास होणे कदापिहि शक्य नाही.त्यामुळे नगरपालीकेत भक्कम व विकासाभिमुख पर्याय देण्याची गरज असुन त्यासाठी देवळाली प्रवरा हेल्फ टीम नगरपरिषदेच्या आखाड्यात उतरुन शहरवासींयांना त्यांना चांगला पर्याय उपलब्ध करुन देणार आहे असे या टीमचे अध्यक्ष दत्ता कडुपाटील यांनी आज आराध्या काॅम्पेल्केसमध्ये पार पडलेल्या देवळाली प्रवरा हेल्प टीमच्या बैठकीत प्रतीपादन केले.
देवळाली प्रवरा शहरात कोवीड काळात नावारुपाला आलेली व शहरवासींयांना दिवसरात्र सेवा दिलेली हि हेल्प टीम गावातील क्रिडांगण ग्रामीण रुग्णालय तसे इतरही महत्वाचे गोष्टीबाबत निरपेक्ष भावनेने काम करत आहे.गावाच्या नियोजनबध्द विकासासाठी आग्रही असलेल्या या टीमने नगरपरिषद निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
या हेल्प टीम मध्ये सर्वच पक्षाचे सदस्य असुन ते आपआपल्या पक्षांचे प्रमुखांना स्वच्छ चारित्र्यसंपन्न व उच्चशिक्षीत विकासाभिमुख उमेदवार देण्यास आग्रही रहाणार आहे.परंतु तेच ते उमेदवार पुन्हा लादुन व नको त्या अंतर्गत तडजोडी करुन नुरा कुस्ती उभारली गेली तर देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीम नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरणार असुन सर्वच ठिकाणी उमेदवार उभे करुन भक्कमपणे लोकांसमोर जाणार आहे.
निवडणुकीत आघाडी व स्थानीक समविचारी पक्ष एकत्र येत सध्याचे सत्तारुढ भाजपा पक्षास पायउतार करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असतील तर त्यासोबत जाण्याची या टीमची मानसीकता आहे.
या बैठकीस दत्ता कडुपाटील , आप्पासाहेब ढुस,प्रशांत काळे,जेम्स पाळंदे ,तुषार शेटे, सागर सोनावणे,अनिस शेख , रजनी कांबळे,गीताराम बर्डे ,दिपक पाडाळे,खालीद शेख, प्रशांत कराळे,पांडु शेटे,अमजद इनामदार ,ऋषी संसारे ,सोपान कडु,गणेश कडु विजय कुमावत , धनंजय डोंगरे आदींसह हेल्प टीमचे सदस्य बहुसंख्येने हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *