
कोपरगाव प्रतिनिधी:- समाजातील हुशार गरिबी गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हेलपिंग हॅंड हि संस्था आर्थिक मदत करीत आहे गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे समाजातील अनेक दानशूर व्यक्ती या उपक्रमाला मदतीचा हात देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रेरणा देतात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात व पुन्हा संस्थेच्या माध्यमातून मदत करतात

या वर्षी सेवा निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ गुंजाळ यांच्या हस्ते मदत प्रदान करण्यात आली सनदि लेखापाल खेमनर यांनी प्रास्ताविक केले संस्थेची स्थापना व उपक्रम विषयक माहिती दिली सेवानिवृत्त होणा-या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले डॉ गोवर्धन हुसळे काही पालकांनी मनोगत व्यक्त केले प्रा डॉ गणेश देशमुख यांनी सुत्रसंचलन केले प्रा डॉ निघोट यांनी आभार प्रदर्शन केले समारंभ साठी अनेक मान्यवर मंडळी विद्यार्थी पालक उपस्थित होते.
