युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांचे मुळे कोरोना रुग्णांना नवे जीवदान:-आप्पासाहेब दवंगे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मुळे हजारो कोरोना रुग्णांना नवे जीवदान मिळाले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केले.
तालुक्यातील मुर्शतपुर येथील पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, डॉक्टर, आशा सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, ग्रामसेवक, विद्युत्, पोस्ट कर्मचारी, नर्स यांचेसह शेकडो कोरोना योद्ध्यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सन्मान नुकताच करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
याप्रसंगी सर्वश्री, अन्वर भाई शेख, मधुकर उगले, रामदास शिंदे, त्र्यंबक दवंगे, संदीप उगले, दिलीप शिंदे, रंगनाथ उगले, नाना शिंदे, सुधाकर शिंदे, जालिंदर शिंदे, प्रकाश दवंगे, राजू दवंगे, सुहास दवंगे, जगन्नाथ दवंगे, संदीप गुरुळे, असलमभाई शेख, आरिफ शेख, शिवाजी शिंदे, कर्णi शिंदे, चंद्रकांत दवंगे, ज्ञानदेव दवंगे बाळू आवारे, संजय घोडेकर, गोटू शिंदे, गणेश मोरे, सिताराम तिपायले, श्री. गाडेकर आदि पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. आप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की, कोरोना महामारी संसर्ग मोठ्या प्रमाणात असताना दुसऱ्या लाटेत देवदूतात्च्या माध्यमातून युवानेते विवेक कोल्हे हे कोरोणा रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी संजीवनी कोविड व डेडीकेट सेंटर उघडून त्याद्वारे हजारो रुग्णांची मोफत सेवा केली. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक कोल्हे हे सातत्याने संकटकाळात धावून येतात त्यांची ही कामगिरी इतरांसाठी व संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी एक आशादायी बाब आहे. कोरोना आपत्तीत जिल्ह्यात अन्य ठिकाणी केल्या जाणाऱ्या कामकाजाचा अभ्यास करून त्यावर युवा नेते विवेक कोल्हे यांनी उपचारातील त्रुटी दूर करत हजारो रुग्णांना दिलासा दिला ही बाब अभिमानाची आहे. याप्रसंगी कोरोणा योध्य म्हणून उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचाही रामदास शिंदे व सहकाऱ्यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *