मातंग समाजाला सांस्कृतिक भवनासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावचे आ मा आशुतोष काळे यांनी विविध समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी भरघोष निधीची घोषणा केली असून त्यांच्या प्रमाणेच मातंग समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निधी मिळावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या प्रसिद्धी पत्रकात पोळ पुढे म्हणाले कोपरगाव शहरात विविध समाज बांधवांची समाज मंदिरे व सांस्कृतिक भवन आहेत कोपरगाव तालुक्याचे आ मा आशुतोष काळे यांनी नुकत्याच विविध समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन व समाज मंदिरासाठी भरघोष निधीची घोषणा केली असून त्यामुळे ज्या समाज बांधवांना सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी निधी मिळाला त्या समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे
कोपरगाव शहरात व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मातंग समाज आहे मात्र मातंग समाजासाठी अद्याप समाज मंदिर अगर सांस्कृतिक भवन नाही मागील अनेक वर्षांपासून मातंग समाज बांधवांच्या संस्कृतीक भवन उभारणीसाठी कोणीही प्रयत्न केले नाही अगर पुढाकार घेतला नाही सुमारे दहा बारा वर्षांपासून कोपरगाव शहरात सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे कामासाठी समाज बांधव संघर्ष करत आहेत अण्णा भाऊ साठे साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकाचे काम पूर्णत्वास आले आहे मात्र या स्मारकाच्या पाठीमागे जागा उपलब्ध असून या ठिकाणी असलेल्या जागेवर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण जागा बळकावली आहे शहराच्या वैभवात भर टाकणारे एवढे मोठे स्मारक होत असताना व त्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे
मागील वर्षी लोक स्वराज्य आंदोलन व समाज बांधवांच्या वतीने आमदार महोदय यांना अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या पाठीमागील जागेवर सांस्कृतिक भवन उभारणी साठी निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती मात्र अध्याप त्या मागणीचा कोणताही विचार झालेला नाही मात्र असे असले तरी आ आशुतोष काळे साहेब यांनी या वर्षी विविध समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन उभारणी साठी भरघोष निधी उपलब्ध करून दिला मात्र मातंग समाज बांधवांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी कोपरगाव शहरात कुठेच जागा उपलब्ध नाही त्यामुळे विविध सामाजिक कामे करत असताना समाज बांधवांना अडचण निर्माण होते त्यामुळे लवकरच समाज बांधवांचे निवडक समाज बांधवांना सोबत घेऊन आ आशुतोष काळे साहेब यांची भेट घेऊन मातंग समाज बांधवांच्या सांस्कृतिक भवन उभारणीसाठी निधी मिळावा अशी मागणी करणार आहे असे पोळ यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *