श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनामूल्य पशुवैद्यकीय सेवा:-मुकुंद मामा काळे…

कोपरगाव


कोपरगाव प्रतिनिधी:- श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष डाॅ.श्री.मनोजजी भुजबळ साहेब यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा/ पुण्यतिथी दिवशी कोपरगाव तालुका परिसरात विनामूल्य पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. याप्रसंगी महात्मा फुले मंडळ कोपरगाव अध्यक्ष श्री.प्रदीपजी नवले साहेब, कोपरगाव नगरपालिका नगरसेवक श्री.वैभवभाऊ गिरमे, श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष मुकुंद मामा काळे, संघाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक माळवदे, उपाध्यक्ष संतोष रांधव, सचिव योगेश ससाणे, संपर्क प्रमुख संदीप डोखे , खजिनदार अनंत वाकचौरे, कोपरगाव शहरध्यक्ष शेखर बोरावके, शहर उपाध्यक्ष मनोज चोपडे आदि उपस्थित होते.


डॉ मनोज भुजबळ हे पशुवैद्य असून सदर उपक्रम ते महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी तसेच संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी गेल्या १० वर्षांपासून विनामूल्य पशुवैद्यकीय सेवा देतात. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक माळी बोर्डींग, महात्मा फुले मंडळ कोपरगाव व श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य तसेच परिसरातील सर्वच शेतकरी बांधव करत असतात.
अशी माहीती श्री.मुकुंद मामा काळे यांनी दीली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *