आमची जिरवण्यांच्या नादात कोपरगांवकरांची जिरवू नका; विकासाच्या मुददयासाठी भरचौकात या ठोकाठोकीसाठी नको-विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव

कोेेपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगावच्या विकासाच्या अनेक मुददयावर आपण आवाहन करूनही आमदार आषुतोश काळे चर्चेला यायला तयार नाही पण भर चैकात येवुन ठोकुन काढू ही काही सुसंस्कृत नेत्याच्या वारसाची भाषा नाही कोपरगांवकरांची संस्कृती नाही, शहर विकासात जर तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नगरपालिका, वाचनालय, पोलिस ठाणे, अग्नीशमन, बसस्थानक इमारती, निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन, 42 कोटीसह वाढीव 7 कोटीची पिण्यांच्या पाण्यांची योजना, पाचव्या साठवण तळयाची मंजुरी, बंदिस्त नाटयगृहासाठी 2 कोटी आदि मंजु-या देवुनही कोल्हेंनी कोपरगांवच्या विकासाची वाट अडविली या आमदार व त्यांच्या समर्थकांच्या आरोपात तथ्य नाही, आमची जिरवण्यांच्या नादात कोपरगांवची जिरवू नका म्हणजे झालं असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक व भाजपाचे युवानेते विवेक कोल्हे यांनी केले. उलट आमदारांनीच कोपरगांवची स्मार्टसिटी घालवून सुशिक्षित बेरोजगारांना नोक-यांपासुन वंचित ठेवण्यांचे पाप केले असेही विवेक कोल्हे म्हणांले.
कोेपरगांव पालिकेच्या इतिहासात उपनगराध्यक्षपदी हाजी करीम कुरेशी यांचे सुपुत्र व मुस्लीम समाजाचे युवानेर्तृत्व अरिफ कुरेशी यांची बिनविरोध निवड झाली त्यांचा पदग्रहण समारंभ शूक्रवारी झाला त्यांच्या सत्कारप्रसंगी श्री. विवेक कोल्हे बोलत होते. प्रारंभी शिवसेनेचे जिल्हा नेते कैलास जाधव, विनोद राक्षे, अकबरभाई शेख, फकिर महंमद पहिलवान यांची भाषणे झाली. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, विजय आढाव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, स्वप्नील निखाडे, नारायण अग्रवाल, मनसेचे सतिश काकडे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, रिपाईचे जितेंद्र रणशुर, वैभव गिरमे, किरण सुपेकर, गोपीनाथ गायकवाड, पिंकी चोपडा, सुशांत खैरे, संचालक प्रदिप नवले, हाजी मेहमुद सयद, रियाज सर, निसारभाई सयद, मौलाना हमीदभाई, हाजी नजिरभाई, गुलाब नबी शेख, हाजी सददामभाई, हाजी मेहमुदभाई, अॅड दारूवाला आदि उपस्थित होते.

        श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणांले की, कोपरगांव शहर विकासात आम्ही कधीही मतभेदाची दरी निर्माण केलेली नाही तर उलट आमदार आषुतोश काळे यांना निळवंडे शिर्डी कोपरगांव, पाचवे साठवण तळे, कोरोना महामारी आदि विविध मुददयावर एकत्र येवुन बैठक घेवुन चर्चेतुन प्रश्न सोडविण्यांचे आवाहन केले होते परंतु त्याला त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही, कारण सगळं श्रेय कोल्हेंना जाईल ही भिती त्यांना वाटत असावी पण आमची तशी इच्छा नाही.  आज कोपरगांवच्या इतिहासात मुस्लीम समाजाच्या नेर्तृत्वाला उपनगराध्यक्षपदी आरूढ झालेलं पाहुन सर्वाथाने लौकीक वाटतो. माजीमंत्री शंकरराव कोल्हे व बिपीनदादा कोल्हे यांनी हाजी करीमभाई कुरेशी यांच्यासह सर्व मुस्लीम बांधवांच्या प्रत्येक सुख दुःखात समर्थपणे सहभाग देवुन त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजवर प्रयत्न केलेले आहे. युवापिढींने भडकावूपणांला साथ न करता आपले हीत कशात आहे हे पाहुन काम करावे. मुंबई समृध्दी मार्गाच्या कामात कोपरगांव येथे प्रस्तावीत स्मार्ट सिटी होवु घातलेली असतांना येथील लोकप्रतिनिधींनी ती न्यायालयात जाउन रदद केली अन 25 हजार युवकांच्या नोक-या घालविण्यांचे पाप काळेंनी आपल्या माथी मारून घेतले., या स्मार्टसिटीतुन छोटया मोठया व्यावसायिकांसह व्यापा-यांचे पोट भरले असते.  तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुस्लीम कब्रस्थानासह 21 विकासकामे प्रत्यक्ष नजरेत आणली आहेत.कोपरगांवच्या विकासासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवा या मुस्लीम मौलानांच्या आवाहनला आपण शंभर टक्के साथ देवु असे विवेक कोल्हे यांनी शेवटी सांगत त्यांनी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांना सर्वतोपरी सहकार्याचे आष्वासन देवुन शूभेच्छांचे पाठबळ दिले. शेवटी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

फोटोओळी-कोपरगांव:-
कोेपरगांव पालिकेच्या इतिहासात उपनगराध्यक्षपदी हाजी करीम कुरेशी यांचे सुपुत्र व मुस्लीम समाजाचे युवानेर्तृत्व अरिफ कुरेशी यांची बिनविरोध निवड होवुन त्यांचा शूक्रवारी पदग्रहण समारंभ झाला सत्कारप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक, भाजपाचे युवानेते श्री. विवेक कोल्हे यांनी सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *