खून करुन पळून जाणार्या आरोपीस अवघ्या काही तासातच कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी केली अटक..!

कोपरगाव

मारहाण करुन पिकअप गाडीत टाकुन जिवे मारण्याच्या उद्देशाने अपहरण करुन मयताचा मृतदेह हरसुल ता. त्र्यंबक, जि. नाशिक भागातील घनदाट जंगलात मृतदेह फेकुन देवुन पुरावा नष्ट करुन पळुन जाणारा आरोपी अवघ्या तासात कोपरगाव तालुका पोलीसांकडुन जेरबंद…

कोपरगाव प्रतिनिधी:-
सौ सुनिता सोन्याबापु मलिक, वय 55 वर्ष, धंदा शेती, रा. कासली, ता कोपरगाव जि. अहमदनगर यांनी फिर्याद दिली की, देविदास उर्फ चेतन बापू आसणे याची फिर्यादीचे सुनेवर बाईट नजर आहे म्हणून त्यास कामावरुन काढून टाकले होते. याचा राग मनात धरुन दि. 01/07/2021 रोजी 21:00 ते 21:30 वा. चे दरम्यान देविदास उर्फ चेतन बापु आसणे याच्या घराजवळ पढेगाव ता कोपरगाव येथे यातील आरोपी देविदास उर्फ चेतन बापु आसणे व केशव बापु आसणे यांनी फिर्यादीचा मुलगा महेश सोन्याबापु मलिक यास मारहाण करुन पिकअप गाडीत टाकुन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केले होते. त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 249/2021 भा. द. वी. कलम 364, 323, 34 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य लक्ष्यात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाने तपास सुरु होता.आरोपीचा कोणताही ठावठिकाणा नसताना वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने लागलीच घटनास्थळी भेट देवून आरोपी हा नातेवाईकाच्या घरी भेटण्याच्या शक्यतेच्या आनुषंगाने मा. पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड, पोहेका इरफान शेख व पोकों जयदीप गवारे असे दिनांक 02/07/2021 रोजी मध्यरात्री आरोपीचे शोधकामी टाकळी फाटा चांदोरी ता निफाड येथे महामार्गावर गेले, टाकळी फाटा येथे आरोपीचे नातेवाईकाचे घर असल्याने तेथे आरोपी येण्याची शक्यता असल्याने आरोपीच्या नातेवाईकाचे घरी चांदोरी, टाकळी फाटा, ता. निफाड, जि. नाशिक येथे महामार्गावर सापळा रचून आरोपी येण्याची प्रतिक्षा केली. थोड्या वेळाने आरोपी वाहनासह येवून पोलीसांची चाहुल लागल्याने वाहनासह पळुन जात असताना आरोपीच्या वाहनावर पथकाने जीवाची परवा न करता धाडसाने, मुत्सदोने, जीवाची बाजी लावुन चालु वाहनावर व आरोपोवर डप घालून त्यास ताब्यात घेतले व त्याला विश्वासात घेवून विचारपुस केली त्याने महेश सोन्याबापु मलिक यास लोखंडी कुन्हाडीने मानेवर मारुन जीवे ठार मारले व त्याचे प्रेत हरसुल जि. नाशिक येथील जंगलात फेकून दिल्याचे सांगितले, आरोपीने दिलेल्या माहीती नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश आव्हाड, पोहेकॉ इरफान शेख व पो.कॉ.जयदीप गवारे असे मृतदेहाचे शोधकामी आरोपी सह रवाना झाले आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी कायरीची बारी, कचरपाड़ा शिवार, गावठा रोड, हरसुल ता त्र्यंबक जि नाशिक येथे महेश सोन्यावापु मलिक याचा मृतदेह आढळून आला आहे सदर गुन्हयातील आरोपी देविदास उर्फ चेतन बापु आसणे व केशव बापु आसणे दो. रा. पढेगाव ता कोपरगाव यांना मा. न्यायालयात हजर केले असता त्यांना मा. न्यायालयाने दिनांक 08/07/2021 पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केले आहे.सदरची कौतकास्पद कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील सो, मा. अपर पोलीस अधिक्षक सो दिपाली काळे मॅडम, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी सो संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक दौलत जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, पोहेको इरफोन शेख व पो.कॉ. जयदीप गवारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *