संजीवनी अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांची विध्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी कॅनडात निवड:- श्री. अमित कोल्हे…

कोपरगाव

संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धी..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या वैष्णवी विनोद नाईकवाडे, चैतन्य संतोष टेकाने व अंजली अनिल निकम यांची कॅनडातील मिटॅक्स या संस्थेर्मात तीन वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये संशोधनात्मक इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की मिटॅक्स ही कॅनडा मधिल संस्था असुन मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप हा ऑस्ट्रेलिया , चीन, कोलंबिया, फ्रान्स, जर्मनी, हाॅंन्गकाॅन्ग, भारत, मेक्सिको, पाकिस्तान, तैवान, ट्युनिसिया, युक्रेन, आणि युनायटेड स्टेटस् या देशांमधील पदवीधरांसाठी स्पर्धात्मक उपक्रम आहे. प्रत्येक वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत उच्च श्रेणीच्या कॅनेडियन विद्यापीठातील प्राध्यापकांच्या देखरेखीखाली विज्ञान, अभियांत्रिकी, गणित अशा विविध विषयांमध्ये १२ आठवड्यांच्या संशोधन इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या विध्यार्थांना प्रत्यक्ष सहभाग नोदवविणे आवश्यक असतो. मिटॅक्स ग्लोबलिंक रिसर्च इंटर्नशिप सध्या कॅनडातील ७० हुन अधिक विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत.
मिटॅक्स आणि आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्यामधिल सामंजस्य करारामुळे भारतातील एआयसीटीईच्या अखत्यारीतील संस्थांमधिल विध्यार्थ्यांना या इंटर्नशिपचा फायदा होतो. भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा संस्थांमधिल विध्यार्थ्यांची निवड मोठ्या संख्येने होते. मात्र संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी संजीवनी मधुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर मिटॅक्सच्या सर्व कसोट्या पुर्ण करून बाजी मारली. मागील वर्षी फक्त एकच विध्यार्थ्याची निवड झाली होती. मात्र या वर्षी ३ विध्यार्थ्यांची निवड झाली आहे. या सर्व विध्यार्थ्यांचा विमान प्रवास खर्च, राहणे व जेवणाची व्यवस्था कॅनडा सरकार तर्फे करण्यात येणार आहे. संजीवनीच्या वैष्णवी नाईकवाडे हिची युनिवरसिटी ऑफ ब्रुन्सविक, चैतन्य टेकाणेची युनिवरसिटी ऑफ दि माॅन्ट्रील व अंजली निकमची युनिवरसिटी ऑफ लावेल क्युबेक मध्ये इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डाॅ. महेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे छोटेखानी कार्यक्रमात श्री अमित कोल्हे यांनी सत्कार केला. यावेळी टेक्निकल डायरेक्टर श्री विजय नायडू, डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. माजी मंत्री व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनीही विध्यार्थ्यांच्या यशाबध्दल अभिनंदन केले.

फोटो ओळीः-
कॅनडा मधिल मिटॅक्स संस्थेमार्फत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तीन विध्यार्थ्यांची कॅनडातील विद्यापीठांमध्ये संशोधनात्मक इंटर्नशिपसाठी निवड झाली. श्री अमित कोल्हे यांनी विध्यार्थी व त्यांच्या पालकांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *