कोपरगावकरांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे हृदयरोग तपासणी..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोनाची परिस्थिती व नागरिकांची मागणी लक्षात घेता रुग्णांप्रती असलेली बांधिलकी जोपासत एसएमबीटी हॉस्पिटलतर्फे विविध तालुक्यात हृदयरोग शिबिरे आयोजित करण्यात येत असतात , याच धर्तीवर कोपरगाव येथे गुरुवार दि २७ रोजी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन केल्याची माहिती हॉस्पिटल प्रतिनिधी प्रीती झवर यांनी दिली, सदर शिबीर सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत सप्तर्षी मळा, बस स्टॅन्ड समोर,कोपरगाव येथे होणार आहे .
छातीत दुखणे,जळजळणे ,छातीवर भार वाटणे ,चालताना जास्त दम लागणे,अचानक घाम येणे,श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवतात असल्यास नक्की शिबिराला भेट देऊन तपासणी करावी.
कोरोना काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी,आजार अथवा दुखणे अंगावर काढू नये, योग्य उपचार व शस्रक्रियेने हृदयरोग नक्की बरा होतो असे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.गौरव वर्मा यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले व जास्तीस्त जास्त नागरिकांनी शिबिराला भेट देऊन आपले हृदय तपासून घ्यावे असा सल्ला देखील दिला.
कोरोनामुळे मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे , दिनचर्या, धावपळ ,अवेळी जेवण, धूम्रपान, ताणतणाव अश्या विविध कारणामुळे हृदयरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, तरी कोपरगाव व शेजारी असलेल्या तालुक्यातील नागरिकांनी हृदय तपासणी करून घ्यावी असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *