कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील यांचे सुपुत्र शिवराज BEcivil-MS (USA) व कन्या शिंवाजली BEcivil, PDGM – ACM हया विषयात पदवी मिळाल्या बदल यांचे हार्दिक अभिनंदन..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावचे सुपुत्र चि.शिवराज मंगेशराव पाटील हे BE सिव्हिल नंतर एम.एस. ( MS ) पदवी संपादन करणारे कोपरगाव तालुक्यातील पहिले विद्यार्थी ठरले आहे ..


तर कु.शिवांजली मंगेशराव पाटील ही बी.ई.सिव्हिल नंतर PDGM-ACM ( ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट) पदवी संपादन करणारी कोपरगाव तालुक्यातील पहिली विध्यार्थीनी ठरली आहे…

कोपरगावचे माजी नगराध्यक्ष मंगेशराव पाटील व सौ.प्रियालक्ष्मी मंगेशराव पाटील यांचे सुपुत्र आणि कन्येचे समस्त कोपरगावकरांकडून अभिनंदन…

कोपरगाव तालुक्यातील शिवराज मंगेशराव पाटील या तरुणाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील कन्स्ट्रक्शन मॅनजमेंट व्यवस्थापनात मास्टर पदवी संपादन केली आहे.अशी उच्च पदवी संपादन केलेले कोपरगाव तालुक्यातील सिव्हिल क्षेत्रातील ते पहिले पदवीधर ठरले आहे.
चि.शिवराज यांचे आजोबा संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त बांधकाम अभियंता माधवराव पाटील यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर कोल्हापूर पध्दतीचे के.टी.वेअर बंधारे व तालुक्यात छोटे-मोठे बंधारे आणि बांधकाम क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे.त्यांचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव मोठा राहिला आहे.पुढे तोच वारसा चालवत त्याचा मुलगा मंगेश पाटील यांनी कोपरगाव शहरातील शिवस्मारक सह विविध राष्ट्र पुरुषांची स्मारके उभारणी तसेच विविध बांधकामांच्या माध्यमातून नावलौकिक मिळविला आहे.नगराध्यक्ष पदाच्या अल्पावधिच्या काळातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.सध्या ते महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त तसेच विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी असतात.श्री.मंगेशराव यांचा सिव्हिल क्षेत्रातील अनुभव आणि मार्गदर्शन वेळोवेळी कोपरगावकरांना राहिले आहे.
चि.शिवराज याने आजोबा (माधवराव), वडील (मंगेशराव) यांचा बांधकाम क्षेत्रातील वारसा पुढे चालवत ठेवण्याचा निर्णय घेवून बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन केली आहे.
चि.शिवराज आणि कु.शिवांजली हे संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे शालेय शिक्षण झाले.तर श्री सद्गुरू गंगागीर महाराज (एस.एस.जी.एम.)महाविद्यालय येथे या दोघांनी १२ पर्यंत विज्ञानाची पदवी संपादन करत पुढील शिक्षण संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केली.
त्यानंतर कु.शिवाजली हिने बी.ई.सिव्हिल मध्ये फायनल इयर ( वर्षात ) कॉलेज मध्ये पहिली आली. नंतर पुणे येथे निकमार (NICMAR) कॉलेज येथून दोन वर्षांची PDGM-ACM (ॲडव्हान्स कन्ट्रक्शन मॅनेजमेंट) ही पदवी संपादन केली आहे.अशी पदवी संपादन करणारी ती कोपरगांव तालुक्यातील पहिली मुलगी आहे.

तर चि.शिवराज याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात बांधकाम (सिव्हिल) पदवी संपादन केल्या नंतर बांधकाम क्षेत्रातील उच्च पदवी संपादन करण्यासाठी त्यांचे वडील मंगेशराव यांनी प्रेरीत केले.त्यानंतर त्याने अमेरिकेतील लाॅस एन्जलिस येथील कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी येथून बांधकाम क्षेत्रातील व्यवस्थापनात मास्टर पदवी संपादन केली आहे.अशी उच्च पदवी संपादन केलेले कोपरगाव तालुक्यातील ते पहिले पदवीधर ठरले आहे.
कोपरगाव तालुक्यातील शिक्षणात पुढे जाणार्या तरुण मुला-मुलींना चि.शिवराज आणि कु.शिवांजली प्रेरणा स्रोत ठरले आहे.त्यांचा दैदिप्यमान यशा बद्दल सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
सुशांत घोडके
सूर्यतेज संस्था,कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *