भूमिपूजनाची हौस पूर्ण करण्यासाठीविवेक कोल्हेंकडून नागरीकांना दमबाजी:- नगरसेवक जनार्दन कदम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामासाठी आमदार आशुतोष काळे यांनी निधी दिला असतांना भूमिपूजन आपल्याच हातून व्हावे यासाठी स्वत:ला युवा नेते म्हणवून घेणाऱ्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी नागरीकांना दमबाजी केली असून यापुढेही असाच सत्तेचा उतमात सुरु राहिल्यास कोपरगावकर आणि स्वामी समर्थ भक्त त्यांना माफ करणार नाही अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक जनार्दन कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नगरसेवक जनार्दन कदम यांनी पुढे म्हटले आहे की, आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराचा मागील चाळीस वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जवळपास चाळीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे व कोपरगाव नगरपरीषदेच्या वतीने भूमिपूजन कार्यक्रम देखील ठरलेला होता. परंतु आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या निधीतील कामाचे भूमिपूजन, उद्घाटन करून स्वत:च्याच हाताने स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार कोपरगाव नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाकडून सुरु असतांना यामध्ये आता त्यांचे नेते देखील मागे रहायला तयार नाहीत. रविवार (दि.१९) रोजी कोपरगाव शहरातील सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यासाठी काडीचेही योगदान नसतांना हे स्वयंघोषित युवा नेते विवेक कोल्हे भूमिपूजन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ज्यांचे योगदान नाही त्यांच्या हस्ते कशाला भूमिपूजन करता अशी भूमिका घेवून नागरीकांनी या युवा स्वयंघोषित नेत्याला भूमिपूजन करण्यासाठी विरोध केला.

त्यावेळी आपली भूमिपूजनाची हौस पूर्ण होणार नसल्याचा राग विवेक कोल्हे यांना आल्यामुळे त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच नागरीकांना दमबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून त्यामुळे कोपरगावचे नागरीक व स्वामी समर्थ केंद्रातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता मिळाल्यापासून सत्ताधाऱ्यांनाकडून नागरीकांना दमबाजी करण्याचे प्रकार वाढत चालले असून दमबाजी करण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे देखील मागे नाहीत. अशीच परिस्थिती यापुढेह सुरु राहिल्यास कोपरगावची जनता त्यांना योग्यवेळी योग्य धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असे नगरसेवक जनार्दन कदम यांनी शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *