कोपरगांवात ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील जुने गांवठाण भागातील मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
ग्रामदैवत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तिथीनुसार हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा केला जातो. या वर्षीही पहाटे हनुमान मुर्तीची मराठा पंच मंडळाचे विश्वस्त सौ. व श्री. विद्यासागर शिंदे, प्रसिद्ध सराफा सौ. व श्री. दिपक विसपुते यांचे शुभहस्ते पुजा करून आरती करण्यात आली. मंदिराचे सभामंडपात पाळणा ठेवून त्यात बाल हनुमानाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. हनुमान जन्मोत्सव प्रसंगी उपस्थित भजनी मंडळ यांनी भजन, पाळणागीत गायन केले. उपस्थितांना गुळ, बुंदी लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई आकर्षक पध्दतीने करण्यात आली होती.

याप्रसंगी मराठा पंच ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष संजय भोकरे, विश्वस्त बाळासाहेब नरोडे, विजय आढाव, प्रकाश गवारे, मंदार आढाव,अॅड.विद्यासागर शिंदे, कारभारी नजन श्री गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई ठोंबरे, कविता साळुंके, कुमोदिन कुलकर्णी, सौ.संगिता नरोडे, सारिका कुलकर्णी, पौरोहित्य दत्तोपंत ठोंबरे गुरु, साई नरोडे, श्रीराम येवले, संजय होन यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *