कोपरगाव नगरपरिषदेच्या समित्यांचा कारभार ‘लाडक्या बहिणींच्या’ हाती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
कोपरगाव नगरपरिषदेच्या शहरविकासाला नवी दिशा देण्यासाठी विविध विषय समित्यांची नुकतीच गठना करण्यात आली असून, या समित्यांमध्ये महिलांचे सशक्त नेतृत्व ठळकपणे पुढे आले आहे. एकूण सहापैकी चार समित्यांवर महिलांची निवड होऊन कोपरगाव नगरपरिषदेत लाडक्या बहिणींचे ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण, पाणीपुरवठा समितीवर वैशाली विजय वाजे, शिक्षण, क्रीडा व संस्कृती समितीवर संजना संजय उदावंत तर महिला व बालकल्याण समितीवर सविता कैलास मंजूळ यांची निवड करण्यात आली आहे तर या समितीवर उपसभापतीपदी मनीषा दत्तू पगारे यांची निवड झाली असून महिलांच्या नेतृत्वाला आणखी बळ मिळाले आहे.
नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर तर स्वच्छता व आरोग्य समितीवर वैभव सुधाकर आढाव यांची निवड करण्यात आली आहे. शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांची सर्वानुमते, एकमताने निवड करण्यात आली.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आ. स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे,नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व मान्यवर, नगरसेवक व नागरिकांनी अभिनंदन केले आहे. महिलांच्या हाती जबाबदारी दिल्याने शहराच्या विकासकामांना संवेदनशीलता, पारदर्शकता आणि वेग येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कोपरगावच्या विकासाचा हा नवा अध्याय असून, सर्व समित्यांच्या माध्यमातून नागरिकाभिमुख, समतोल आणि सर्वसमावेशक विकास साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *