श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत शौर्य दिवस साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:
कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत युध्दाचा २६५ वा "शौर्य दिवस" सोमेश्वर महादेव देवस्थान, कोपरगाव गांवठाण वेस समोर साजरा करण्यात आला आहे.


पानिपतच्या रणभूमीवरील रणझुंजार वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार, मराठा साम्राज्याची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) बाजीराव पेशवा, कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम सदाशिवराव (खासेसाहेब) श्रीमंत महामहीम यशवंतराव (भाऊसाहेब) सदाशिवराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन कोपरगांवचे वीज वितरण अभियंता धनंजय धांडे, मा. कॅप्टन सागर बडदे, श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रमुख महेंद्र पाटील ,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांचे शुभहस्ते करण्यात आले. "हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीमंत महामहीम पवार सरकार की जय" असा जय घोष करीत २१ तोफांची सलामी देण्यात आली.


प्रारंभी सोमेश्वर महादेवचे पुजन करण्यात आले.याप्रसंगी सोमेश्वर महादेव भक्त परिवाराचे मिलिंद नागरे, नारायण अग्रवाल, जयंत विसपुते,महावीर शिंगी, परेश उदावंत, मनोज कपोते, नंदू शेंडे-गुरव, युवराज नलगे आदिंसह सोमेश्वर देवस्थान भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. ४ वर्षापासून श्रीमंत पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान येथे पानिपत रणसंग्राम शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी मानले. भाविकांना तिळगूळ वाटप करुन मकरसंक्रांत आणि शौर्य दिवस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *