गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने हिवाळी परीक्षा २०२५ पदविका अभियांत्रिकी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूटच्या सर्वच विभागांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांनी याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
महाविद्यालयाचा शेकडा निकाल ९७% एवढा लागला असून महाविद्यालयात कु.बढे अनुष्का ८९.७७% गुण मिळवून प्रथम, कु. घारे अपूर्वा ८८.५९% गुण मिळवून द्वितीय,कु. गुडघे समृद्धी हिने ८७.४१% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले असून प्रथम वर्षाचा एकूण शेकडा निकाल ९९% एवढा लागला असून प्रथम कु. बढे अनुष्का ८९.७७%, द्वितीय वाघडकर अभिजित ८५.०६%, तर पाचोरे सार्थक या विद्यार्थ्याने ७९.८८% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे.
द्वितीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९६% एवढा लागला असून यामध्ये मेकॅनिकल विभागात प्रथम क्रमांक घुले हर्ष ७६.४४ %, द्वितीय शिंदे प्रवीण ७५.७८%, तृतीय लासुरे मोहनीश ७३%, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम कु. ठोंबरे सायली ७८.३५%, द्वितीय कु. ठोंबरे अनुजा ७६.३५%, तृतीय कु. चिने निकिता ७५%, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम कु. महाजन इशा ८४.३५%, द्वितीय कु. अबक प्रतीक्षा ८०.९४%, तृतीय कु. गायकवाड शिवानी ७९.६५%, द्वितीय वर्ष सिव्हिल विभागात प्रथम काळे सृष्टी ७९.८८%, द्वितीय कु.सुरासे समीक्षा ७९.५३%, तृतीय पानगव्हाणे यश किशोर ७९.१८%.
तृतीय वर्षाचा शेकडा निकाल एकूण ९८% एवढा लागला असून यामध्ये तृतीय वर्ष मेकॅनिकल विभागात प्रथम जाधव संकेत ७९.४१%, द्वितीय क्रमांक कु.भोसले साक्षी ७८.९४%, तृतीय क्रमांक वहाडणे ओमप्रकाश ७८.८२%, तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल विभागात प्रथम मुरडणार अरुण ७८.३५%, द्वितीय डोलणार राहुल ७७.६५%, तृतीय क्रमांक कु.गवांदे पूजा ७३.४१%, तृतीय वर्ष कॉम्प्युटर विभागात प्रथम कु. घारे अपूर्वा ८८.५९ %, द्वितीय कु. गुडघे समृद्धी ८७.४१%, तृतीय कु. गोरे श्रुष्टी ८५.५३%, सिव्हिल विभागात प्रथम क्रमांक थोरात राहुल ७८.३३ % द्वितीय जाधव यशराज ७६.७८%, तृतीय कुंभार्डे प्रथमेश ७६ % गुण मिळविले आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्थेचे विश्वस्त व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, मानद सचिव सौ.चैतालीताई काळे, सहसचिव सौ. स्नेहलताई शिंदे, तसेच सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, संस्थेचे इनस्पेक्टर प्रा. नारायण बारे, प्राचार्य वसिम शेख, कार्यालयीन अधीक्षक अण्णासाहेब बढे, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *