के. जे. सोमैया महाविद्यालयामध्ये अॅस्ट्रो क्लब तर्फे जेमिनीड उल्का वर्षावदर्शन  कार्यक्रमाचे आयोजन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी रात्री ९ते ११ वाजेपर्यंत के. जे. सोमैया महाविद्यालयातील अवकाश निरीक्षण केंद्रातर्फे आकाश निरीक्षण व जेमिनीड उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम कोपरगाव परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना, अवकाश अभ्यासकांना व खगोलप्रेमीसाठी खुला आणि मोफत ठेवण्यात आला होता अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी दिली.
महाविद्यालयातील अवकाश निरीक्षण केंद्र ही एक अत्याधुनिक वेधशाळा आहे. तेथे दहा इंची शक्तिशाली दुर्बीणीच्या साह्याने शनी व गुरु यासारखे ग्रह व आकाशातील व्याध व राजन्य यासारखे तारे आलेल्या खगोलप्रेमीना दाखवण्यात आले. याशिवाय महाविद्यालयच्या प्रांगणातून आकाशातील विविध तारकासमूह, भारतीय नक्षत्रे, विविध राशी, ध्रुवतारा, यांची रंजक माहिती व जेमिनीड उल्का वर्षावा विषयी विस्तृत माहिती भूगोल विभागाचे व अवकाश निरीक्षण केंद्राचे समन्वयक डॉ. वसुदेव साळुंके यांनी दिली.महाविद्यालयातील पदार्थविज्ञानशास्रचे डॉ. निलेश पोटे यांनी खगोलभौतिकीशास्त्रातील ताऱ्यांचा जन्म, ताऱ्यांची तेजस्विता या विषयी सखोल मार्गदर्शन केले. या उपक्रमात कोपरगाव व परिसरातून विविध शाळांचे व महाविद्यालयाचे विद्यार्थीतसेच शंभरहून अधिक खगोलप्रेमी हजर होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्टर डॉ. अभिजीत नाईकवाडे डॉ. महारुद्र खोसे,प्रा. संपत माळी, प्रा.जयश्री खंडिझोड, प्रा. श्रावणी आढाव उपस्थित होते.या उपक्रमासाठी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *