
कोपरगाव प्रतिनिधी:-
१५ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तसेच खासदार श्रीकांत शिंदे व आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत प्रसाद दिलीप सारंगधर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उत्तर नगर जिल्हा प्रमुख नितीन औताडे , तालुका प्रमुख रावसाहेब थोरात, कोपरगाव शहर प्रमुख अक्षय जाधव यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पक्षवाढीसाठी अहोरात्र मेहनत करून तळागाळापर्यंत पक्षाचे काम पोहचवणार असल्याचे प्रसाद सारंगधर यावेळी म्हणाले.
