गोधेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(गोधेगाव ):-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महाराष्ट्र आणि एकूणच देशासाठी असलेले योगदान लक्षात घेऊन कोपरगाव तालुक्यातील गोधेगावचे ग्रामस्थ व न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे जयंतीचे आगळे-वेगळे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी ढोल-ताशा किंवा डीजेच्या सहाय्याने जयंती साजरी करण्यापेक्षा काहीतरी वेगळे आणि विशेष करावे या महत उद्देशाने गोधेगाव ग्रामस्थांनी आपल्या गावच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील खेळाडू विद्यार्थ्याला खेळाचा गणवेश भेट देत एक आदर्श वस्तूपाठ घालून दिला आहे.
याप्रसंगी ग्रामस्थांनी एकमेकांशी संवाद साधताना ‘आता लोकशाहीरांच्या विचारांची जयंती साजरी करू या आणि काहीतरी विधायक घडवू या’ अशा भावना देखील व्यक्त केल्या.
यावेळी संबंधित न्यू इंग्लिश स्कूल गोधेगाव येथील मुख्याध्यापक मा. जुधारे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर, शिक्षक वृंद, मा. ग्रामसेवक, ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आयोजनासाठी प्रा. किरण सोळसे, वैभव सोळसे सर, पंडितराव सोळसे, संतोष लक्ष्‍मण सोळसे, सागर मधुकर सोळसे, संतोष विठ्ठल सोळसे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *