इंदिरा शॉपिंग सेंटर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री.श्यामसुंदर श्रीरामजी डागा (श्री मेडिकल) यांना कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने “सुवर्ण महोत्सवी सेवा पुरस्कार” प्रदान हार्दिक अभिनंदन:- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आमच्या इंदिरा शॉपिंग सेंटर परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री.श्यामसुंदर श्रीरामजी डागा (श्री मेडिकल) यांना कोपरगाव तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने “सुवर्ण महोत्सवी सेवा पुरस्कार” देण्यात आला हार्दिक अभिनंदन..!
सलग 50 वर्ष मेडिकल सेवा दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
गोदाम गल्ली येथे श्याम मेडिकल येथे 15 वर्ष व इंदिरा शॉपिंग सेंटर मध्ये 35 वर्ष त्यांनी मेडिकल दुकान द्वारे जनतेची सेवा केली आहे. एकाच व्यवसायात 50 वर्ष टिकून राहणे ही साधी सोपी गोष्ट नाही, पण यांनी मोठ्या हिमतीने जिद्दीने हे शिव धनुष्य पेलणे. ग्राहकांना सतत हसतमुख राहून त्यांनी सेवा दिली. औषधाचे उपयोग वगैरे अनेक गोष्टी त्यांनी ग्राहकांना समजून सांगितल्या. त्यामुळे ते लवकरच ग्राहकांमध्ये लोकप्रिय झाले.
श्यामभाऊच्या आयुष्यात व व्यवसायात अनेक चढ-उतार आले,पण श्याम भाऊंनी मोठ्या हिमतीने ते पार पाडले. 1916 साली जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या कार्यकारणीवर निवड झाली. त्यावेळेस त्यांनी कोपरगाव येथे केमिस्ट भवन बांधण्याचा निर्धार केला. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश वाणी,जितु भाऊ गंगवाल,भरत मोरे व सर्व केमिस्ट असोसिएशनची कार्यकारणी त्यांनी अथक परिश्रम घेऊन 25 साली केमिस्ट भवन चे उद्घाटन करण्यात आले. कोणत्याही व्यापारी संघटनेची स्वतःची कार्यालय असणे ही मोठी गोष्ट आहे. केमिस्ट भवनाची निर्मिती श्री.श्याम भाऊ यांच्या कार्याची पावती आहे. केमिस्ट असोसिएशनच्या कार्याबरोबर माहेश्वरी समाजाच्या अनेक कार्यक्रमात त्यांचे योगदान मोठे आहे. आमच्या इंदिरा शॉपिंग सेंटरच्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून भाग घेतात. मोठा मित्रपरिवार श्याम भाऊ यांना लाभला आहे. त्यांच्या या सर्व गुणामुळे व मेडिकल स्टोरला 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांना माननीय सहाय्यक आयुक्त श्री.मेटकर साहेब यांच्या हस्ते सुवर्ण महोत्सवी सेवा पुरस्कार मोठ्या थाटामाटात देण्यात आला. या वेळस केमिस्ट असोसिएशनच्या तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा पार पाडला.
श्री.गणेश वाणी यांचे खंबीर नेतृत्व कोपरगाव केमिस्ट असोसिएशन यांना लाभले आहे ही मानाची व भाग्याची गोष्ट आहे.
याप्रसंगी श्री.श्याम भाऊ डागा यांनी याप्रसंगी आनंद व्यक्त करताना सौ.विजया भाभी व सुपुत्र राहुल व दोन्ही मुली त्यांच्या परिवारातील सदस्य श्री.विजयराव जाधव यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी श्री.केतनजी कर्डिले, सचिनजी शिंदे साहेब,श्री.संदीपजी पारेख, श्री.रवी भाऊ पवार, आदी केमिस्ट बांधवांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
आदरणीय हेमंतजी मेटकर साहेब यांनी केमिस्ट जीवनात येणाऱ्या अडी अडचणी व अनेक बाबीवर प्रकाश धोत टाकला, उपस्थित श्रोतू वर्गाला हसत ठेवले.
श्री.श्यामसुंदर जी डागा यांनी आपण यशस्वी उद्योजक आहोत यांनी या प्रसंगातून सिद्ध केले.
*अशा या आमच्या श्री.श्याम भाऊ डागा यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो अशी ग्राहक सेवा यांच्या हातून घडो अशा शुभेच्छा….!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *