
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा १२ वी चा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेतलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
१२ वी विज्ञान शाखेचा निकाल -97%
खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) गुंड मयूर भाऊसाहेब एकूण गुण – ५१५ एकूण टक्के – ८५.८३ %
२) कु.थोरात स्तूती मंगेश एकूण गुण – ४८४ एकूण टक्के – ८०. ६७ %
३) कु. फटांगरे अर्चना कैलास एकूण गुण – ४८३ एकूण टक्के – ८०. ०५ %
१२ वी वाणिज्य शाखेचा निकाल – 83.33%
खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कु. गुरसळ दिव्या दिगंबर एकूण गुण – ५४२ एकूण टक्के – ९०. ३३ %
२) कु. वाघचौरे सिद्धी राजेंद्र एकूण गुण – ५३४ एकूण टक्के – ८९ %
३) शर्मा सिया गुरून एकूण गुण – ५२९ एकूण टक्के – ८८. १७%
१२ वी कला शाखेचा निकाल – 55%
खालील प्रमाणे तीन विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले आहेत.
१) कु. त्रिभुवन स्नेहल बापू एकूण गुण – ५०० एकूण टक्के – ८३. ३३ %
२) कु. बागुल सुजता कचेश्वर एकूण गुण – ४६४ एकूण टक्के – ७७. ३३%
३) विदुर साईनाथ संदीप एकूण गुण – ४५९ एकूण टक्के – ७६. ०५%
महाविद्यालयाची यशस्वी निकालाची परंपरा कायम.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ॲड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त श्री. संदीप रोहमारे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य प्रो. डॉ. विजय सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी.नाईकवाडे यांनी अभिनंदन केले.
वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरु झालेली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.कॉम.(सीए.), बी.एस्सी.(सीए.), बी. एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) चे प्रवेश सुरु झाले आहेत. तसेच महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून B.Sc. Data Science & B.Sc. Artificial Intelligent & Machine Learning हे दोन नवीन कोर्सेस चालू केलेले आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य प्रो. डॉ. विजय सी. ठाणगे यांनी केले आहे.
