कोपरगाव नगरपालिका शिक्षकांचा जिल्हा शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील यांच्या हस्ते सन्मान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांनी २१ व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी व त्याबरोबरच मुलांमध्ये संगणकीय विचार, सहयोग, सांघिक कार्य, तार्किक कार्य आणि कोडींग याचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर, अहिल्यानगर, जिल्हा परिषद ( प्राथमिक शिक्षण विभाग ) अहिल्यानगर व लीडरशीप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर मध्ये ॲमेझॉन फ्यचुर इंजिनियर प्रकल्प २०२३-२४ या वर्षापासून राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत प्राथमिक शिक्षकांसाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग, scratch कोडींग, Sequencing यांसारख्या घटकांवर ब्लेंडेड कोर्से तयार करण्यात आले होते. यामध्ये नगरपालिका शिक्षण मंडळ, कोपरगाव येथील शिक्षकांनी यश संपादित केले. श्रीम. सुनिता इंगळे व श्री नवनाथ सूर्यवंशी यांनी मेंटोर टीचर म्हणून यश मिळवले, तर श्रीम. नसरीन इनामदार व श्री अर्जुन शिरसाट यांनी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले. या शिक्षकांना प्रत्येकी दोन tablet व प्रमाणपत्र जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. भास्कर पाटील साहेब यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले.यावेळी सौ. जयश्री कार्ले (विस्तार अधिकारी ), रविराज निंबाळकर, दिलीप कासार (लेखाधिकारी, जि. प. अहिल्यानगर )व प्रा.रामेश्वर लोटके ( डायट संगमनेर ) इ. मान्यवर उपस्थित होते.हॉटेल राज पॅलेस वाडिया पार्क, अहिल्यानगर येथे हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी मुख्या. श्री विलास माळी, श्री. सुनील रहाणे, व श्री अमोल कडू, उपस्थित होते. नगरपालिका शिक्षण मंडळ, कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकरी श्री सुहास जगताप, कोपरगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम, प्रशासनाधिकारी,सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *