एकवेळ भूक मिटेल पण लागलेली तहान भागवा, पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवा:- बिपीनदादा कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगांव उपबाजार आवार मोर्विस (धामोरी फाटा) कोपरगांव येथील जागेचा भूमिपुजन सोहळा रविवार मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. बाजार समितीला सर्वोतोपरी सहकार्य आपले आहे आणि पुढेही कायम असेल कारण सहकारी तत्वावर चालणारी ही संस्था भरभराटीला आली पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळेल असे यावेळी ते म्हणाले.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा पूर्वीचा इतिहास पाहता भुसारासाठी सर्वोत्तम बाजारपेठ होती. काळानुरूप खाजगी बाजार समित्या आणि पाण्याच्या तुटवडा यामुळे बाजार समितीला स्पर्धात्मक वातावरण झाले आहे. मंचावर सर्वच पक्षाचे नेते आता एकत्र आहे त्यामुळे जसे इतर प्रश्न सुटतात तसे या पंचवार्षिकमध्ये केवळ फक्त पाणी हा एकमेव प्रश्न घेऊन आपण विधानसभा आणि मंत्रालय पातळीवर मैदानात उतरल्यास पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून मोठा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले आहे.
याप्रसंगी श्री.बिपिनदादा कोल्हे यांनी एक वेळ भूक मिटेल पण तहान लागल्यावर पाण्याचा काय असा भावनात्मक प्रश्न विचारून पाणी या विषयाला वाचा फोडली. वास्तविक हे कटू सत्य व समर्पक असे उद्गार आहे. पूर्वीपासून अन्न,वस्त्र व निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा आहे, हे सर्वांनी मान्य केले आहे पण आता या तीन वस्तू बरोबर पाणी ही सुद्धा चौथी गोष्ट असायला हवी असे म्हटल्यास अतिशयोक्ति ठरणार नाही. काळे,कोल्हे,विखे सर्वजण कोपरगावच्या प्रश्नाकरिता नेहमीच शासनाबरोबर भांडतात पण आता सर्वजण एकाच सत्तेत,एकाच व्यासपीठावर,एकाच मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करतात. यामुळे पूर्वेचे पाणी पश्चिमेकडे हे माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब व माजी मंत्री स्व.शंकररावजी काळे साहेब “पूर्वेचे पाणी पश्चिमेकडे वळवण्याचे” स्वप्न सहज पूर्ण करता येईल. पण त्याकरता या प्रश्नाचा रेटा सर्वांनी मिळून मंत्रालयात लावला पाहिजे. राजकीय दुर्मिळ योग बऱ्याच दिवसानंतर आला आहे. त्यामुळे दादांनी काढलेले उद्गार एक वेळ भूक भेटेल पण पाण्याचा काय या मार्मिक प्रश्नाचे उत्तर मिळेल.
श्री.बिपिन दादा कोल्हे यांनी या प्रश्नाला योग्य ठिकाणी योग्य दिशा दिली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन…!

नारायण शेठ अग्रवाल कोपरगाव. मो-9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *