टेके पाटील ट्रस्टचे कार्य सामाजिक हितासाठी महत्त्वपूर्ण ठरणार :-सुनिताताई आंधळे महाराज ;”मोफत मदत सेवा केंद्रास” सदिच्छा भेट…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी : सामाजिक जीवन जगताना अनेकांची इच्छा असते की आपणही समाजासाठी काहीतरी करावे परंतु; इच्छा, धनसंपत्ती असूनही ती सेवा करण्याची अनेकांना वेळेअभावी संधी मिळत नाही, कारण त्यात भगवंताची कृपा नसते आणि जेव्हा का भगवंताची कृपा झाली. त्यावेळी तुमच्याजवळ संपत्ती जरी नसली तरी भगवंत तुमच्या हातून सत्कर्म करून घेतो. त्याचप्रमाणे राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे आजवरचे कार्य पाहता निश्चितच हे भगवंताच्या कृपाशीर्वादातूनच होत आहे, याचा प्रत्यय येतो आहे. म्हणूनच या ट्रस्टचे कार्य पुढील काळात समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी येत्या काळात खूप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रीय कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प. सुनिताताई आंधळे महाराज आळंदीकर यांनी काढले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘मोफत मदत सेवा केंद्रास’ राष्ट्रीय कीर्तनकार भागवताचार्य ह.भ.प सुनीताताई आंधळे महाराज आळंदीकर यांनी शुक्रवारी (दि.13) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत ह.भ.प. अभिमन्यू महाराज आंधळे आळंदीकर हे देखील उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी ट्रस्टमार्फत चालणाऱ्या सामाजिक उपक्रमासह मोफत मदत सेवा केंद्राच्या कार्याविषयी माहिती देत त्यांचा सन्मान केला.
यावेळी ह.भ.प. रामकृष्ण महाराज चौधरी, ह.भ.प. डॉ. सर्जेराव महाराज टेके, ह.भ.प. संदीप महाराज वैद्य, आरपीआयचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, मुस्लिम आघाडीचे तालुकाध्यक्ष पप्पू सय्यद, वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाळुंज, सोमनाथ थोरात, नितीन चौधरी, गणेश भाटी, सुरज टेके, स्वप्निल टेके, शंकर धामणे, आकाश निळे, बाळू दुशिंग, केतन भारुड, बंटी निळे, युनूस शेख, अरीफ शेख, सलमान शेख, साहिल शेख, असिफ शेख, राहुल त्रिभुवन, अमित झाल्टे, शितल टेके, वृंदा जाधव यांच्यासह ग्रामस्थ, स्वयंसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *