श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी श्री. अनिल अमृतकर यांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या पर्यवेक्षक पदी श्री. अनिल अमृतकर सर यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये कार्यरत असलेले प्रदीर्घ ३२ वर्षांच्या सेवेनंतर त्यांची निवड करण्यात आली.
कोपरगाव तालुक्यात जेष्ठ कलाशिक्षक म्हणून नावलौकिक असलेले श्री. अनिल अमृतकर यांनी नुकताच पदभार स्वीकारला. कोपरगांव एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. कैलास ठोळे, सचिव श्री. दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव श्री. सचिन अजमेरे, सदस्य श्री. डॉ. अमोल अजमेरे, सदस्य श्री. संदीप अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,दीलीप तुपसैंदर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रमेश गायकवाड, उपमुख्याध्यापक श्री. रघुनाथ लकारे,सर्व शिक्षक या प्रसंगी उपस्थित होते.
विदयालयाला खुप महान परंपरा आहे.नावलौकिक आहे तो जोपासण्याचा मी प्रयत्न करील अशी ग्वाही या वेळी नूतन पर्यवेक्षक श्री.अनिल अमृतकर यांनी दिली.
गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश आबा परजणे,गटशिक्षणाधिकारी शबाना शेख मॅडम, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य पदमाकांत कुदळे,अरुण चंद्रे, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक चंदुलाल बजाज, जगन्नाथ चौधरी,गजानन शेटे,रमेश गवळी, मकरंद कोऱ्हाळकर,जेष्ठ नागरीक मंचचे विजय बंब,न.पा. शिक्षण मंडळाचे श्री.साईश शिंदे,अमित पराई,विषय तज्ञ श्री.विजय सोंनजे आदीनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *