महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांची दिवाळी गोड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा पत्रकार समाजाच्या समस्यांना सर्वांच्या समोर आणुन तसेच अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य करत असतो त्याच अनुषंगाने संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या संकल्पनेतून व शुभहस्ते
तसेच कोपरगाव तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप व संगमनेर अध्यक्ष संजय गोपाळे यांच्या उपस्थितीत कोपरगाव येथील
पत्रकाराची मिठाई व भेटवस्तू देत दिवाळी गोड करण्यात आली.

याप्रसंगी कोपरगाव शहराध्यक्ष हफिज शेख, कार्याध्यक्ष बिपिन गायकवाड, उपाध्यक्ष स्वप्नील कोपरे, ज्येष्ठ पत्रकार फकीरराव टेके, युसूफ रंगरेज, संतोष जाधव,सोमनाथ सोनपसारे, किसन पवार, विनोद जवरे, राहुल कोळगे, अमोल गायकवाड, सोमनाथ डफळ, राजेंद्र तासकर,रवींद्र जगताप, अक्षय काळे, काकासाहेब खर्डे, गणेश बत्तासे, मधुकर वक्ते, दीपेश डफळ आदी कोपरगाव तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे, संजय गोपाळे, जनार्दन जगताप यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विजय कापसे यांनी केले तर तालुका अध्यक्ष , शहरध्यक्ष, जेष्ठ पत्रकार यांच्या शुभहस्ते सरचिटणीस डॉ आरोटे व संजय गोपाळे यांचा सत्कार करण्यात आला. तर उपस्थितांच्या हस्ते
नुकताच पार पडलेला महाराष्ट्र संवाद दौरा या पुस्तकेचे प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *