शिर्डी व कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(अहिल्यानगर):– भारत निवडणूक आयोगाने शिर्डी आणि कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी कविथा रामू (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. निवडणूक निरीक्षक कविथा रामू यांच्याशी ८८३०७८४६५५ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार असून त्यांना शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत भेटता येईल.
निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३७८७३३४ असा असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *