

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव परिसर कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियम, सूचना व उपाययोजनांचे तंतोतंत पालन करा, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचा इशारा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव परिसर शी बोलातांना सांगितले.
शासनाने कोविड-19 विषयक जे निर्बंध घातले आहेत त्या आदेशाचे बारकाईने वाचन करावे व दिलेल्या सूचनांचे तालुक्यातील नागरिकांनी पालन करावे अन्यथा सदर आदेशाचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहेत. सध्या कोपरगावमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे.
कोरोनाची साखळी तुटावी, नागरिकांचे आरोग्य सुरक्षित रहावे व कोरोना संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून शासनाने दिलेल्या सुचनेचे नागरिकांनी पालन करणे गरजेचे आहेत जो नियमांचे उल्लंघन करणार त्यावर तसेच मास्क न घालणाऱ्यांवर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.नागरिकांनी प्रशासनाकडून वारंवार देण्यात येणा-या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे, मास्क लावणे, गर्दी न करणे,वेळोवेळी हात स्वच्छ धुवातेत. शक्यतो घरीच थांबावे असे आवाहन कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले. जेणेकरून आपण, आपले कुटुंब व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल व कोरोनापासून बचाव होईल असेही देसले कोपरगाव परिसर शी बोलतांना म्हणाले.
