
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुका विविध क्षेत्रातील समाजसेवकांची खाण आहे हा परिसर संपूर्ण देशाला सर्व दिशांना मध्यवर्ती असून हा परिसर दुष्काळी असला तरी विविध धार्मिक तिर्थक्षेत्र, औद्योगिक करणाने वेढला आहे. प्रभु रामचंद्रांच्या कर्मभूमीत मराठवाड्यातील अंबेजोगाई येथील शैक्षणिक,वैद्यकीय क्षेत्रातील सर्व शैक्षणिक कसोट्यातून अव्वल स्थान पटकाविणाऱ्या डॉ.दत्तात्रय शामराव मुळें (MD . and ECHO cardiografy ) यांनी आपले उज्ज्वल भविष्यासाठी कोपरगांव तालुक्यात ग्रामीण भागातील पहिल्या क्रिटिकल रुग्णालयाची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली. हृदयरोग,हार्टॲटक,पॅरालेसिस , शॉकसह सर्व प्रकारच्या विषबाधा आदी गुंतागुंतीच्या प्राणघातक आजाराने शेवटच्या घटका मोजणाऱ्या76000 वरील रुग्णांच्या आजाराचे जलद निदान करून तातडीने त्यांचेवर उपचार करून अवघड परिस्थितीत न डगमगता मृत्यूच्या दाढेतून सहिसलामत वाचविण्यात डॉ मुळेंचा हात कोणी धरु शकले नाही हे कोणीच नाकारू शकत नाही.
तीन वर्षातील कोरोना महामारी दहशतीखाली संपूर्ण जग स्वतः एकट्याला घरात मृत्यूच्या धास्तीने कोंडून घेत असतांनाच डॉ. मुळे यांनी जगात सर्वत्र सर्व आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नाखूष असतांनाच 700 स्वतः रुग्णावर त्यांच्या शरीरास स्पर्शून वैद्यकीय उपचार करून सुखरूप आपले जीवन जगण्यासाठी घरी पाठवले आहे.
गत चाळीस वर्षात आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा लाभ सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी कोपरगांव ,येवला, साई संस्थान रुग्णालय, प्रवरानगर रुग्णालय, भारतीय जीवन विमा ,संजीवनी व गौतम सहकारी उद्योग समूहाचे मदतीने परिश्रम घेतले.
डॉ.दत्तात्रय मुळे यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत वैद्यकीय सेवेत मग्न असताना त्यांनी आपली संगीत आराधना उत्तम रितीने सांभाळली. आपल्या सुमधुर संगीत गायन प्रसंगी प्रेक्षक आपले भान हरपून उत्तम ठेका धरीत त्यांना उत्तम साथ देवून त्यांच्या संगीत कलेचे चीज करते यावरुन ते किती शागिर्द यांची चुणूक आपणास जाणवते डॉ. मुळे यांनी रोटरी क्लब, इंडियन मेडिकल असोसिएशन,आय.पी .आय. ,आर.एस.एस.डी. आय(नवी दिल्ली ) महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद आदी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय वैद्यकीय, समाज सेवा परिषदेतील सहभाग, प्लॅस्टिक सर्जरी शिबीर, मधुमेह उपचार शिबीर, राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहीम, कॉर्डिओलॉजी उपचार शिबीर, जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर , सर्व सामान्य जनतेला आरोग्य सुविधा मार्गदर्शन, आदी आपल्या अनेक सामाजिक, स़ंघटनात्मक अभिनंदनीय यशस्वी उपक्रमांचा ठसा उमटवला. त्यांचा हा अमूल्य ठेवा त्यांचे सुपुत्र डॉ. संकेत व सूष्ना सौ.प्राजक्ता संकेत मुळे, डॉ . शिरीष व डॉ.सौ. प्रियंका शिरीष मुळे तेवढ्याच ताकदीने जोपासून जनसेवा करीत आहे.
याचबरोबर आपल्या अंधपणावर मात करीत संगीत क्षेत्रात राज्य, देशपातळीवर गेल्या 50 वर्षात एकट्याच्या बळावर किमान हजारांहून अधिक संगीत विशारद घडविण्याची किमया घडवितांना आनंदराव आढाव पाटील यांनी संगीत सेवेचा कोणत्याही स्वरूपात वारसा , कौटुंबिक पार्श्वभूमी आधार नसताना संगीत क्षेत्रात राज्य, देश पातळीवर आपला दबदबा निर्माण केला हेच मोठे आश्चर्य वाटते..
आनंदराव आढाव यांनी सर्वं पातळीवरील वैद्यकीय, विधी न्याय, शिक्षण, व्यावसायिक, सेवाधारी समाज घटकांना मिळेल त्या मानधनावर सर्वोत्तम संगीत विशारद बनविले हे महाराष्ट्रातील जनतेने अनुभवलं आहे.
संगिताचार्य आनंदराव आढाव पाटील आणि आमचें कुटुंबिय एकाच गल्लीत रहात असल्याने त्यांनी माझ्यावर आणि माझ्या अग्रवाल कुटुंबियांवर मोठा भाऊ नात्याने कायम मायेची पखरण ठेवली.
याशिवाय येथील माजी समाज कल्याण मंत्री स्व.दादासाहेब रुपवते यांचे सहकारी स्व.के.पी. बनसोडे यांचे चिरंजीव व मागासवर्गीय युवक संघटनेचे आधार स्तंभ माजी सरकारी वकील ॲड. अशोक बनसोडे यांचे कनिष्ठ बंधू प्राध्यापक डॉ.शैलेंद्र बनसोडे यांनी आपले पिताश्री व बंधूंच्या पावलावर पाऊल टाकत करमसी जेठाभाई सोमैय्या वरिष्ठ महाविद्यालयात कायमस्वरूपी शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक उपक्रमांना यशस्वी हातभार लावीत शेकडो विद्यार्थी - विद्यार्थींनींना विविध प्रकारच्या समस्यावर सखोल मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या सेवेत हजारो तरुण पिढीची मने जिंकली आहेत.
अशा कोपरगांव शहरातील त्रिवेणी संगम साधणाऱ्या मान्यवर हृदय रोग तज्ञ डॉ.दत्तात्रय मुळे, संगीताचार्य आनंदराव आढाव, प्राध्यापक शैलेंद्र बनसोडे यांचा यथोचित सन्मान कोपरगांव येथील संकल्पना फौंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाचे चे प्रमुख संचालक बिभीषण चवरे व अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या शुभहस्ते, गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी 3 वाजता गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील दुध उत्पादक संघाचे मुख्य कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने या भाग्यशाली आणि कर्तबगार त्रिमूर्ती चे कोपरगांवकरांचे वतीने त्रिवार अभिनंदन !!!
-- जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव
योगेश जोबनपुत्रा, व जितेंद्र गंगवाल
