रोप निर्मिती करुन आपला परिसर निसर्गरम्य करुया:- सुशांत घोडके ; रयत गुरुकुल अंतर्गत पर्यावरणावर विशेष व्याख्यान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
आपल्या परिसरातील वेगवेगळ्या प्रजातीची देशी झाडांच्या बियांचे संकलन करुन त्यापासून स्वतः रोप निर्मिती करुन आपला परिसर आपणच निसर्गरम्य करुया. असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांनी केले.
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता इंग्लिश स्कूल येथे रयत गुरुकुल बाह्यतज्ञ मार्गदर्शन अंतर्गत “परिसरातील वनस्पती, बी-बीयाणे आणि पर्यावरण” या विषयावर विशेष व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित पर्यावरणप्रेमी सुशांत घोडके यांचे आयोजित केले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मोरे,प्र.पर्यवेक्षक मुरलीधर भोये, गुरुकुल विभागाचे जनार्दन खेताडे, भिका बागुल,विलास मोरे,संजय मढावी,दिनकर लोहरे, हेमगौरी साळुंके,विष्णु ढोले, मनोरमा खातुन, भगवान शिंदे, सुनील वाघमारे यांचेसह शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी श्री. घोडके पुढे म्हणाले, सजीवांचा नैसर्गिक अधिवास घटत चालला आहे. झाडांचे प्रमाण घटून अनेक ठिकाणी पक्षांचा नैसर्गिक अधिवास नसल्याने त्यांचा जीव धोक्यात येतो आहे. अशा प्रसंगी वृक्षारोपण आणि संगोपन या निरंतर चालणा-या प्रक्रियेत सहभागी होवून आहे ती सर्व झाडे जगवायला हवीत. प्रत्येक विद्यार्थ्याने बी-बीयाणे संकलन करून त्याची बॅंक तयार करावी. यातून स्वतः रोप निर्मिती करुन त्याचे योग्य ठिकाणी रोपण करावे. असे सांगत पर्यावरण समोतोलासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असाल्याचे सांगितले.


प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मोरे यांनी पर्यावरण व्याख्याते वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचा शाॅल,श्रीफळ आणि परिसरातील फुलझाडांचा विद्यार्थ्यांनी तयार केलेला पुष्पगुच्छ भेट देवून स्वागत केले.
सुत्रसंचालन सुनील वाघमारे यांनी केले तर आभार भगवान शिंदे यांनी मानले.उपस्थितांचे शुभहस्ते कडूलिंब रोपाचे रोपण करुन पालकत्व देण्यात आले.या प्रसंगी प्रत्येक विद्यार्थ्यांने बियांपासून दहा झाडाची रोपे तयार करण्याचा संकल्प केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *