जागतिक आरोग्य दिन… आरोग्य सेवकांबाबत कृतज्ञता व्यक्त करूया:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांच्या चांगल्या आरोग्या साठी प्रार्थना करूया , तर कोविड-१९ च्या विरोधात जे धैर्याने युद्ध लढत आहेत त्या डॉक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ आणि आरोग्य सेवकां बाबत कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या आरोग्यासाठी श्री साईबाबांना साकडे घालू या… संपूर्ण जग गेले वर्षभर कोरोना विषाणूशी लढा देत आहे. बदलत्या परिस्थितीत आव्हानांना सामोरं जाताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, मास्कचा वापर करा. सुखी व निरोगी आयुष्यासाठी सर्वांना शुभेच्छा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *