
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव येथील नावाजलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये नविन शैक्षणिक वर्ष 2024-25 आज दिनांक 15 जुन रोजी सुरू झाले आहे यावेळी शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मोठ्या जल्लोषात विद्यार्थ्यांचे स्वागत केले.. केजी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाबाहेर संबंधित वर्ग शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन तसेच जोरदार टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून स्वागत केले.. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल च्या मॅनेजिंग ट्रस्ट आदरणीय सौ. रेणुका ताई विवेक भैय्या कोल्हे मॅडम यांनी प्राचार्य मोहसीन शेख सर व शिक्षक वृंदांच्या मदतीने केले.. या उपक्रमाबद्दल पालकांनीही समाधान व्यक्त केले.
