कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे गोरक्षनाथ आनंदा शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या नेत्या सौ. स्नेहलता कोल्हे. विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी काम पाहिले.
श्री. गोरक्षनाथ शिंदे यांच्या नावाची सुचना देविदास शिंदे यांनी केली. या प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्य वनिता संपत जाधव, आकांक्षा दशरथ रणशुर, पुनम दत्तात्रय उगले, संगिता सुधीर झगडे, ईरफानभाई कासमभाई शेख, मुक्ताबाई कैलास कुदळे यांनी सहभाग घेतला.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी नवनिर्वाचित उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करतांना म्हणाले की, सहकाररत्न माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुर्शतपुरसह या भागातील प्रत्येक गावांच्या विकासासाठी मोठे योगदान दिलेले आहे. तत्कालीन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी महिला बचतगटाबरोबरच केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनाचा विकास निधी मंजुर करून आणत असंख्य कामे मार्गी लावली आहे. नवनिर्वाचित उपसरपंच गोरक्षनाथ शिंदे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय योजनांची अंमलबजावणी करून मुर्शतपुर गांव विकासासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करू.
याप्रसंगी सर्वश्री मधुकर उगले, रंगनाथ उगले, रामदास शिंदे, साहेबराव शिंदे, अन्वर शेख, प्रकाश दवंगे, त्रंबक दवंगे, सुधाकर शिंदे, संदिप गुरूळे, गोविंद शिंदे, संदिप उगले, शानु शिंदे, मिलन शिंदे, जालिंदर शिंदे, नानासाहेब शिंदे, अनिकेत शिंदे, अरिफ शेख, असलम शेख यांच्यासह विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठय संख्येने उपस्थित होते. शेवटी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक सुनिल रजपुत यांनी आभार मानले.


फोटोओळी-कोपरगांव-
मुर्शतपुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्ष कोल्हे गटाचे गोरक्षनाथ आनंदा शिंदे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. त्याबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला.
