जेऊर पाटोदा येथील संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा ७वा वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व महाभागवत कथेचे आयोजन अवघ्या २५ भाविकांमध्ये सुरू झाले आहे:- ह.भ.प.नवनाथ महाराज खेडकर…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील जेऊर पाटोदा ज्ञानेश्वर माऊली आश्रमामध्ये कोविड-19 मुळे सॅनिटायझर, मास्कचा व सोशल डिस्टंन्सचे पालन करुन दिनांक १९ मार्च २०२१ पासुन ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचा ७वा वर्धापन दिनानिमित्त्य महाभागवत व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सप्ताह सुरू करण्यात आला.
यामध्ये माजी सभापती मच्छिंद्र पाटील केकाण यांच्या मार्गदर्शनातुन व ह.भ.प. नवनाथ महाराज खेडकर यांच्या संकल्पनेतून अवघ्या २५ भाविकांमध्ये हा सप्ताह अतिशय दिमाखदार व रुबाबदार होवु घातला आहे. या कार्यक्रमामध्ये भागवत कथाकार ह.भ.प. श्रीराम महाराज गाडेकर अंजनापूरकर यांच्या अम्रुततुल्य वाणीतुन सुरू करण्यात आला.


या कथेला साथसंगत कोरस पुढील प्रमाणे आहे:- गायनाचार्य ह.भ.प. सोपान महाराज बारहाते, ह.भ.प. हरिभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. नवनाथ महाराज खेडकर, म्रुदुंगवादक ह.भ.प. कु.व्रुंदावनी मोरे, ह.भ.प. क्रुष्णा महाराज रोठे, ह.भ.प. चैतन्य महाराज जाधव, ह.भ.प.नारायण महाराज देसाई, विनेकरी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज केकाण, टाळकरी ह.भ.प. द्वारकाताई नागरगोजे, ह.भ.प. राजेंद्र महाराज धनवटे.

व इतर कार्यकर्ते सरपंच सतिष पाटील केकाण, आणि कैलास पाटील सानप यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभत असुन जर मनावर घेतले तर सर्व वारकरी भाविकांना अशा पध्दतीने सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले तर परमेश्वरी सेवा घडेल व धार्मिक कार्यात कुठेही अधोगती येणार नाही म्हणून तर सर्वांना आवाहन या सप्ताहाच्या माध्यमातून करतो की कोरोना काळात सॅनिटायझर वापरणे

, हात धुणे तसेच तोंडाला मास्क लावणे, सोशल डिस्टंन्सचे पालन करणे आणि प्रशासनास आपण सर्वांनी मिळून सहकार्य केले तर हिच खर्या अर्थाने ह्या वर्षीची ईश्वरी सेवा होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *