

कोपरगाव प्रतिनिधी :- नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन आणि विश्व परिवार यांचे संयुक्त विद्यमाने नुकतीच पुणे येथे तीन दिवशीय राष्ट्रीय व्याख्यानमाला संपन्न झाली .पहिल्या दिवशी उदघाटन कार्यक्रमात कोपरगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ रामदास आव्हाड यांना नॅशनल कौन्सिल फॉर इंडियन मेडिसिन चे एथिक्स अँड रजिस्ट्रेशन चे अध्यक्ष डॉ राकेशजी शर्मा यांचे शुभहस्ते सन्मानित करण्यात आले .

आयुर्वेद प्रचार व प्रसार करतांना अनेक आयुर्वेद वैद्यांना प्रशिक्षित करण्याच्या कार्याची दखल घेऊन विश्व व्याख्यानमालेत त्यांना सन्मानित करण्यात आले .त्यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर येथील श्री सद्गुगुरु विश्वनाथ महाराज रुड्रीकर ट्रस्ट चे आ आनंदमहाराज ,NCISM चे अध्यक्ष डॉ जयंत देवपुजारीजी ,पुणे येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य समीर जमदग्नी ,होमिओपॅथ कमिशन चे अध्यक्ष डॉ अनिल खुराणा उपस्थित होते .स्मृतिचिन्ह ,शाल ,श्रीफळ व मानपत्र त्यावेळी डॉ आव्हाड यांना देण्यात आले ..भारतभरातून अडीच हजारहून अधिक वैद्यगण यावेळी उपस्थित होते …
