

-शफीकभाई सय्यद यांच्या पुढाकारातून नवजात मुलींचे स्वागत, मातांचा सत्कार, शहीद जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार, कर्तृत्ववान, विकासप्रिय व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व तथा भाजप नेत्या स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीतर्फे नवजात मुलींचे स्वागत व मातांचा सत्कार, देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
स्नेहलताताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीच्या वतीने रविवारी, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शफीकभाई सय्यद यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते नवजात मुलींचे स्वागत करण्यात आले. नवजात मुलींना जन्म दिलेल्या मातांचा पुष्पगुच्छ, ड्रायफूट व फळे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कलश लॉन्स येथे मुस्लिम समाजाच्या वतीने देशसेवा करताना शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीरपत्नींचा व वीरमातांचा सन्मान स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तालुका मुस्लिम विकास कमिटी व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने स्नेहलताताई कोल्हे यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुका मुस्लिम विकास कमिटीतर्फे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुस्लिम समाजाच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे आजही मुस्लिम समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कायम प्रयत्नशील आहोत. कोल्हे कुटुंबीयांचे व मुस्लिम समाजाचे अतूट नाते राहिले असून, भविष्यकाळातही अशीच कायम साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी.आर काले, माजी जि. प. सदस्य केशवराव भवर, माजी नगराध्यक्ष आर.डी सोनवणे, माजी नगरेसवक बबलूशेठ वाणी, संदीप देवकर, अशोकराव लकारे, शिवाजीराव खांडेकर, संजय जगदाळे, शफिकभाई सय्यद, रियाज सर, हाजी नसीरभाई सय्यद,अहमदभाई बेकरीवाले, हाजी सद्दामभाई सय्यद, हाशमभाई पटेल, जयेश बडवे, दीपक पंजाबी, अनिल जाधव, अकबरलाला शेख, अन्सारभाई शेख, सलमान कुरेशी, अल्ताफभाई कुरेशी, लियाकतभाई सय्यद, फकीर मोहम्मद पैलवान, रोकडे नाना, खान, रवींद्र रोहमारे,सुखदेव जाधव, राजेंद्र लोखंडे, वैभव गिरमे, अन्वरभाई बेगू शेख, हाजी अबुजरभाई, मजहर सय्यद, आतिक सय्यद, सतीश रानोडे, मौलाना शमशुद्दीन, मौलाना आसिफभाई, आयुबभाई टेलर,इलियासभाई शेख, मौलाना हमीद राहीसाहब, हबीबभाई पटेल, सादिकभाई पठाण, मुक्तारभाई शेख, सोमनाथ म्हस्के, मौलाना निसारभाई, किरण सूर्यवंशी,अनिल जाधव, गोपी सोनवणे, सलीम पठाण आदींसह मुस्लिम समाजबांधव. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
