
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव आवर्जून घेतले जाते असे धडाडीचे व्यक्तिमत्व काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. व्ही. सी. ठाणगे, रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, श्री. संजय पाचोरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्याला उजाळा देतांना त्यांचा राजकारणातील प्रवास विषद केला. महाराष्ट्राचे हसरे, कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे नेते असे त्यांचे व्यक्तिमत्व निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. महाविद्यालयाच्या जडण-घडणीत स्वर्गिय विलासराव देशमुख यांचे योगदान खूपच मोलाचे असल्याचे त्यांनी नमुद केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
