साईश्रद्धा पतसंस्था वारीच्या चेअरमन पदी जितेंद्र संचेती तर व्हाईस चेअरमन पदी अशोकराव कानडे यांची बिनविरोध निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- वारी येथील साईश्रद्धा ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था या संस्थेची २०२३ ते २८ करीता निवडणूक बिनविरोध पार पडली असुन संस्थेच्या चेअरमनपदी जितेंद्रशेठ संचेती यांची तर व्हाईस चेअरमनपदी माजी प स सदस्य अशोकराव कानडे यांची बिनविरोध निवड झाली
सहाय्यक निबंधक कार्यालय कोपरगावचे सहकार अधिकारी श्री एस पी नेरेसाहेब यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या नवनिर्वाचित संचालकांच्या विशेष सभेत सर्व प्रथम मयत संचालक कै राजेंद्र भागवत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
नवनिर्वाचित संचालकांमधून चेअरमन पदासाठी जितेंद्र ललीतचंद संचेती आणि व्हा चेअरमन पदासाठी अशोकराव सुखदेव कानडे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानंतर दोनही अर्ज वैध असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस पी नेरे साहेब यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन जितेंद्र संचेती यांनी व व्हा चेअरमन अशोकराव कानडे यांनी संचालक मंडळ तसेच संस्थचे सर्व सभासद व कर्मचारी यांचे आभार मानले यावेळी बोलताना मिळालेल्या संधीचे सोने करुन संस्थेच्या हिताचे निर्णय घेऊन यापुढेही संचालक मंडळाच्या साथीने चांगले काम करुन दाखविणार असल्याचा विश्वास नुतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला
यावेळी जेष्ठ संचालक प्रकाशराव करडे पाटील यांनी प्रास्ताविक स्वागत करुन संस्थेच्या प्रगती साठी महत्वाच्या सुचना करून शुभेच्छा दिल्या
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक ठोंबळसाहेब यांचे मार्गदर्शनाखाली सहकार अधिकारी श्री एस पी नेरेसाहेब यांनी काम पाहिले संस्थेच्या कामकाजा बाबत श्री नेरेसाहेब यांनी समाधान व्यक्त करुन बिनविरोध निवडणूक पार पडल्या बद्दल सर्वांचे आभार मानले
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व्हा चेअरमन निवडणूक अधिकारी नेरे साहेब व माजी पदाधिकारी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी नवनिर्वाचित जेष्ठ संचालक प्रकाश करडे, वाल्मिक जाधव विजय ठाणगे,गोरख टेके, संतोष काबरा, गोकुळ पलघडमल रहेमान पटेल,बाळासाहेब नेवगे यांचेसह कर्मचारी ,नयन सोनवणे मॅडम, प्रतिनिधी संजय कर्पे, संजय चौधरी उपस्थित होते नवनिर्वाचित चेअरमन, व्हा चेअरमन व संचालक मंडळाचे वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, गोदावरी बायो रिफायणरीज साकरवाडीचे डायरेक्टर सुहास गोडगेसाहेब, जेष्ठ नेते नामदेवराव जाधव, प स सदस्य मधुकरराव टेके ,पत्रकार रोहीत टेके, फकिरराव टेके बाबासाहेब शिंदे,विजय गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *