“डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला तारु शकतील”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सद्या देशाचे सामाजिक, राजकीय वातावरण दूषित झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच देशाला तारु शकतील असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात अनेक धर्म, हजारो जाती असताना सर्व समावेशक व जगातील सर्वात मोठे संविधान दिले असून या संविधानाने सर्व सामान्य जनतेला हक्क व अधिकार दिले मात्र सद्याचे राजकीय व सामाजिक वातावरण पराकोटीचे दूषित झाले असून नागरिकांच्या संविधानिक हक्काची गळचेपी होताना दिसत आहे ही परिस्थिती अशीच राहिल्यास देशाच्या एकात्मतेला धोका पोहचू शकतो असे असले तरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून अंमलात आनल्यास देश जागतिक महासत्ता होऊ शकतो,मात्र आजच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत
देशाला फक्त आणि फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच तारू शकतात
या वेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *