कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील पुणतांबा फाट्याजवळील श्री जनार्दन स्वामी रुग्णालयात १५ ते २० दिवसांपूर्वी ४० वर्ष वयाचा रुग्ण मेंदूतील रक्तवाहिनीचा फुगा फुटून (Aneurysm bleeding) या आजाराच्या उपचारासाठी दाखल झाला होता. न्युरो सर्जन डॉ.उंबरकर यांनी सर्व रिपोर्ट आणि रुग्ण तपासल्यानंतर असे निर्देशनास आले की.मेंदूतील मुख्य रक्तवाहिनीला फुगा असून त्यासाठी एक अवघड जटिल शस्त्रक्रियेची गरज होती.या आजाराला
Sub Arachnoid haemorrhage असे संबोधतात. मुळात या आजारमुळे ५० टक्के रुग्ण मरण पावतात. मेंदूतील या रक्तस्त्रावामुळे रुग्णाच्या डाव्या हात व पायाला Paralysis झाला होता.
यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेची होती.डॉ. उंबरकर यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी सखोल चर्चा करून शस्त्रक्रियेचे फायदे व धोके समजावून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.ही शस्त्रक्रिया जगातील फार कमी रुग्णालयात होत असते.कारण या शस्त्रक्रियेसाठी Neuro microscop अनुभवी न्यूरोसर्जन व भुलतज्ञ यांची गरज असते. शस्त्रक्रिये नंतर रुग्णाची पण तेवढीच काळजी घ्यावी लागते. शस्त्रक्रियेत डॉ.उंबरकरांनी या फुग्याच्या मानेला एक विशिष्ठ प्रकारची Aneurysm क्लिप जी titanium पासून बनलेली असते,ती बसवण्यात आली
ही शस्त्रक्रिया जवळ जवळ ६ ते ७ तास न थांबता लागली ही शस्त्रक्रिया इतकी जठील असते की शस्त्रक्रिये दरम्यान पेशंटचा जीव जावू शकतो.हा फुगा मेंदूतील एक मोठ्या रक्तवाहिनीला होता.त्यास (Supraclenoid Aneurysm ) असे म्हणतात.मेंदूतील सर्वात मोठी अशी शस्त्रक्रिया मानली जाते.या शस्त्रक्रियेसाठी डॉ.उंबरकरांनी आपले सर्व प्रकारचे अनुभव व स्किल वापरले.तसेच या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. विजय कर्डिले यांनी भुल देण्याचे काम केले. डॉ. सायली ठोंबरे आणि डॉ.सुशांत तूसे यांची मदत झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या तबीयतीत हळू हळू सुधारणा झाली.आणि ५ ते ६ दिवसांनी त्याला घरी सोडण्यात आले.
महत्वाची बाब म्हणजे एसजेएस रुग्णालयात येण्यापूर्वी या रुग्णाच्या नातेवाईकांनी या शस्त्रक्रियेसाठी बाहेरील.मोठ्या शहरामध्ये मुंबई,पुणे, नाशिक येथे चौकशी केली असता.या शस्त्रक्रियेसाठी १० ते १५ लाख खर्च होता. मात्र एसजेएस रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत ही शस्त्रक्रिया मोफत झाली.यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.
प्रतिक्रिया
ही शस्त्रक्रिया करणे एवढे सोपे नव्हते.याने रुग्णाच्या जीवास धोका होण्याची दाट शक्यता होती.परंतु अखेर प्रयत्नाला यश आले.आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली.रुग्ण बरा होवुन घरी गेला.
डॉ.प्रसाद उंबरकर मेंदू तज्ञ
एसजेएस रुग्णालय कोकमठाण


फोटो ओळी:-
( १ ) डॉ.प्रसाद उंबरकर मेंदूतज्ञ
( २ ) मेंदूतील रक्तवाहिनी फुटून तयार झालेला फुग्यावर केलेली शस्त्रक्रिया दिसत आहे.
