

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):-
डॉक्टर ए जी फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने राज्यातील आदर्श पत्रकार म्हणून नुकतेच राहता व कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांना पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे,डॉक्टर ए जी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र या संस्थेद्वारे संस्थापक व चित्रपट निर्माता दिग्दर्शक व अभिनेता डॉक्टर अशोक गावित्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2023 या सालाकरता हा पुरस्कार व सन्मानपत्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट व निपक्षपणे पत्रकारितेचे काम करणाऱ्या पत्रकारांना दिला गेला आहे. पत्रकार हा भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे चित्र शब्दात निपक्षपणे मांडतो तसेच लेखनातून नवनवीन विचार मांडून समाजाला नवी दिशा देण्याचे काम पत्रकार करीत असतो,अशा आपण दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल डॉक्टर ए जी फिल्म प्रोडक्शन च्या वतीने आपणास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येत आहे,असे या सन्मानपत्रात म्हटले आहे,शिर्डी येथील दैनिक साई दर्शनचे संपादक जितेश मनोहरलाल लोकचंदानी,पत्रकार राजकुमार गडकरी,कोपरगाव येथील पत्रकार रवींद्र जगताप,नांदगाव येथील पत्रकार प्रज्ञानंद जाधव आदि ना हा पुरस्कार व सन्मानपत्र डॉक्टर अशोक गावित्रे व या संस्थेचे पदाधिकारी पत्रकार हेमंत शेजवळ यांनी नुकताच बहाल केला आहे.राज्यातील एका प्रतिष्ठित व फिल्म क्षेत्र बरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉक्टर ए जी फिल्म प्रोडक्शन या संस्थेद्वारे दरवर्षी असा पुरस्कार पत्रकारांना देण्यात येतो,यावर्षी तो दिला गेला आहे,असेच समाजासाठी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाज कार्याचे काम आणखी आपल्या हातून होत राहो आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आहेत,असे यावेळी डॉक्टर अशोक गावित्रे यांनी म्हटले आहे,तर पत्रकार जितेश लोकचंदानी आणि पत्रकार राजकुमार गडकरी हे आपले पत्रकारितेत गुरु असून या संस्थेच्या माध्यमातून आपण शिष्य या नात्याने गुरूंना हा पुरस्कार देत असल्याचा मला मोठा आनंद आहे,असे यावेळी या संस्थेचे पदाधिकारी व पत्रकार हेमंत शेजवळ यांनी म्हटले,हा मानाचा पुरस्कार व सन्मानपत्र मिळाल्याबद्दल पुरस्कारकर्ते सर्व पत्रकारांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
