स्वामी गोविंददेवागिरी महाराजांचे अभिनंदन:-विवेकभैय्या कोल्हे….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्ह्यातील बेलापुर येथील स्वामी गोविंददेवगिरी महाराज उर्फ परमहंस संन्याशी यांना महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत २०२१.२२ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहिर झाला त्याबद्दल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
ते पुढे म्हणाले की, देशात अयोध्येतील श्रीरामजन्मभुमी प्रश्र्नी कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रसंगानुरूप घेतलेल्या भुमिका वाखण्याजोग्या आहे. संत कार्यात त्यांचे कार्य देश विदेशात नांवलौकीकास्पद असल्याने त्यांची पुरस्कारासाठी केलेली निवड सार्थ आहे. त्यांच्या या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हयाचा अभिमान देश- आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढला आहे.
स्वामी गोविंददेवागिरी महाराजांनी बेलापुरातून सुरु केलेले अध्यात्म कार्य देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारपर्यंत घेऊन गेले आहे. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी श्रीमद भगवत ग्रंथावर व्याख्यान दिले. लहान वयापासुनच त्यांचा अध्यात्माकडे ओढा होता. वेद उपनिषदांचा अभ्यास करून वाराणशी-काशि येथेही त्यांनी अध्ययन केले. स्वाध्याय परिवाराचे जनक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तत्वज्ञानाची पदवी मिळवली त्यांची परमहंस संन्याशी अशी ओळख आहे. कांची स्वामींचा त्यांचेवर आर्शिवाद असून पुणे येथे वेदिक शाळा उभारून गरीबांना मोफत शिक्षण तसेच भुकेलेल्यांना अन्नदानांत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रामायण महाभारत, हनुमान, बुद्ध कथा इत्यादी अध्यामाच्या प्रसारात त्यांचे विशेष योगदान आहे. स्वामी गोविंददेवगिरी यांच्याबरोबरच निळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ बाबा महाराज सातारकर (२०२०.२१) महंत बाभुळगावकर शास्त्री महाराज यांनाही (२०२२.२३) ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहिर झाला त्याबद्दल त्यांचेही संजीवनी उद्योग समूहाचे वतीने विशेष अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यास सदिच्छा व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *