

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिक्षणाचे आधुनिकीकरण झाल्यापासून सर्वत्र शाळांमध्ये डिजिटल क्लास व विविध साधनाचा वापर याचा बोलबाला आहे. कोरोना काळात शाळा बंद असल्याने ऑनलाईन माध्यमातून शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लागली. हाच धागा पकडून नगरपालिका शाळा नं ६, कोपरगाव मधील मुख्याध्यापिका सौ. कल्पना निंबाळकर व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी शाळेचा गुणवत्तापूर्ण कायापालट करायचे ठरविले. निंबाळकर मॅडम यांनी स्वतःपासून सुरुवात करत ४३ इंची स्मार्ट टीव्ही.मुलीकडून शाळेला भेट दिला. प्रशासनाधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे यांनी पुढील टीव्ही कोण घेईल? असे प्रोत्साहनपर आवाहन केले. यास प्रतिसाद देत नगरपालिका शाळा नं ६ च्या विदयार्थीप्रिय, उपक्रमशील शिक्षिका सौ.सविता दिपक साळुंके यांनी स्वतःच्या वर्गाकरिता स्वतंत्र स्मार्ट टीव्ही स्वखर्चाने घेतला. त्याचेच उदघाटन कर्तव्यदक्ष प्रशासनाधिकारी श्री ज्ञानेश्वर पटारे यांचे शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी मुख्याध्यापिका निंबाळकर यांनी प्रास्ताविकात शाळेतील विदयार्थ्यांकरिता शैक्षणिक तळमळ व्यक्त केली. उपस्थितांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर पटारे यांनी अनेक ग्रंथातील दाखले देत गरीब व होतकरू विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्याचे आवाहन केले.नगरपालिकेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कठीण असे कार्य शिक्षक तळमळीने करत असल्याबाबत कौतुक केले. सौ. साळुंके यांनी मनोगतात विद्यार्थ्यांप्रति आत्मीयता व कर्तव्य भावना व्यक्त केली. त्या वर्षभर विदयार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक साहित्य व पूरक आवश्यक मदत करत असतात.या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती सुनीता इंगळे यांनी केले. या कार्यक्रमास वरिष्ठ लिपिक अमित पराई,समन्वयक प्रशांत शिंदे,सर्व मुख्याध्यापक राजेंद्र वानखेडे,मंगल बिबवे, शोभा गाडेकर, शबनम खान,चंद्रकांत शेजूळ ,विलास माळी, माणिक कदम, सुनील रहाणे,उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कल्पना निंबाळकर,व सहशिक्षक सविता साळुंके, अरुण पगारे, आरती कोरडकर,सुनीता इंगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.सविता साळुंके यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. शेवटी आरती कोरडकर यांनी सर्वांचे आभार मानले.
