कोपरगाव शहरातील जुना प्रभाग २ मधील जुनी खराब पाईप लाईन. बदलून नविन पाईप लाईन टाकून मिळावी यासाठी नागरिकांनी आ.आशुतोष काळे व नगरपरिषदेला दिले निवेदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरातील जुना प्रभाग क्र. २ मधील गजानन अपार्टमेंट भागात जुनी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन अतिशय खराब झाली असून त्यातून गाळमिश्रित पाणी येत असल्याने याठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून मिळावी यासाठी आज जुना प्रभाग क्र. २ च्या नागरिकांच्या वतीने आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे व कोपरगाव नगरपरिषद यांना निवेदन देण्यात आले.
सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी त्वरित कोपरगाव नगरपरिषदेला आवश्यक सूचना दिल्या असून उद्यापासून जुना प्रभाग क्र. २ मध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात येईल असे आश्वासन नगरपरिषदेमार्फत नागरिकांना देण्यात आले आहे.
यावेळी सोमनाथजी आढाव, अनिरुद्धजी काळे, विशालजी निकम, संदीपजी सावतडकर, माधवराव पोटे, जयश्रीताई तारु, चेतनजी राणे, नितीनजी सुतार, प्रकाशजी केंद्रे, आबासाहेबजी भांड, वंदनाताई जगझाप, शरदजी कुलकर्णी, आनंदजी देशमुख, सूर्यभानजी जाधव, आदिनाथजी जपे, पांडुरंगजी वेढे, योगेशजी वाणी, राजेंद्रजी बोरावके, कुंदनजी भारंबे, आशुतोषजी देशमुख, ऋतुराजजी काळे, सचिनजी मोरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *