
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- दिल्ली येथे दोन दिवसीय आदिवासी, दलित,भटके विमुक्त,महिला,अल्पसंख्याक यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय अधिवेशन दि.13 व 14 डिसेंबर रोजी इंडिया इंटरनॅशनल स्टेशन येथे अॅक्शन एड या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आले यावेळी देशातील मानवी हक्कासाठी काम करणाऱ्या निवडक कार्यकर्त्यांना उल्लेखनीय काम बद्दल सन्मानित करण्यात आले ह्यूमन राईट डिफेंडर 2022 एकलव्य संघटनेचे महासचिव किरण ठाकरे सर यांना बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष शांता सिन्हा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला यावेळी नॅशनल ह्यूमन राईट कमिशनचे राष्ट्रीय सेक्रेटरी देवेंद्रकुमार सिंग,महिला आयोगाच्या चेअरमन तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव ललिता कुमार मंगलम एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे अॅक्शन एड संस्थेचे डायरेक्टर संदीप छाचरा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
विचार पिठावरून बोलताना शिवाजीराव ढवळे यांनी चळवळीतुन राजकीय दबावाची प्रकिया निर्माण होणे आवश्यक आहे त्या शिवाय सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत अशी भूमिका मांडली त्यांच्या या ठरावाला 25 राज्यातून आलेल्या प्रतिनिधींनी पाठींबा देत सामाजिक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी पुढील काळात देशभरात मजबूत राजकीय भूमिका घेऊन प्रश्नांवर एकत्रित लढा उभारण्याचे ठरवले.
एकलव्य संघटनेच्या माध्यमातून शिवाजीराव ढवळेंच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी करताना आदिवासींच्या प्रश्नावर किरण ठाकरे यांनी शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक 3500 जातीचेदाखले आदिवासी विद्यार्थ्यांना मिळवून दिले राहत्या घराच्या गायरान जमिनीवरील आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासींवरील अन्याय अत्याचार विरोधात भूमिका घेऊन आंदोलन उभे करणे या कार्याची दखल घेत सन्मान करण्यात येत असल्याचे गौरववोदगार अॅक्शन एड संस्थेचे संदीप छाचर यांनी काढले तर हा पुरस्कार माझा नाही तर महाराष्ट्रात संघटनेत काम करणाऱ्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा आहे व मा.शिवाजीराव ढवळे साहेबांचा आहे व तो मी त्यांना समर्पित करतो असे किरण ठाकरे यांनी प्रतिपादन केले.यावेळी महाराष्ट्रातून आलेले कडूदास कांबळे,बजरंग ताठे,मच्छिंद्र गवाले, यांचाही ह्यूमन राईट डिफेंडर 2022 पुरस्कार देवुन सन्मान करण्यात आला
