
कोपरगाव प्रतिनिधी:-
आज गोदामाई पृथ्वीवर अवतरली (प्रकटली)
तो दिवस आहे. आपण आपल्या मित्राला, नातेवाईकाना, घरामधील सदस्य ना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पण जी अनंत काळापासून आपली तहान भागवते आपल्याला स्वच्छ, सुंदर व निर्मळ पाणी देते तिचा वाढदिवस मात्र आपण विसरलो म्हणून तिचा वाढदिवस करण्यासाठी शुटिंग मधून वेळ काढून सिनेअभिनेता. चिन्मय उदगीरकर, राजेश पंडित सर आणि मी रामकुंडावर जाऊन तिची पुजा केली व माफी मागितली सर्वाच्या वतीने आणि सेवा करण्याची शक्ती मागितली व तिला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या…
जय गोदामाई जय त्र्यंबकराज…

