महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची शिर्डीत हॉटेल KBS ग्रेंन्ड मध्ये मिटिंग संपन्न:- मनोजभाऊ वाघ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(सोनगाव):- राहाता तालुक्यातील शिर्डी येथील
महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघ अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांची शिर्डीत हॉटेल KBS ग्रेंन्ड मध्ये मिटिंग संपन्न झाली. यावेळी नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी एकमताने साईबाबांच्या पावन भूमीत राज्यस्तरीय मोफत वधू-वर-पालक परिचय मेळावा आयोजित करण्याचे ठरले. सोमवार दि.१३/२/२०२३ करण्याचे ठरले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री दशरथ भाऊ तुपे, श्री सुनिलभाऊ गायकवाड, श्री आनंदभाऊ बिडवे, श्री महेशभाऊ अहिरे, श्री सचिनभाऊ बिडवे, श्री मुरलीधर सोनवणे, श्री दिलीपजी वाघ, श्री ज्ञानेश्वर गायकवाड, श्री महादेव कदम, अहमदनगर जिल्हा सलून असोसिएशन जिल्हाध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे आश्वीकर, जिल्हा संपर्कप्रमुख व शिर्डी शहराध्यक्ष संजय भाऊ जाईबहार, जिल्हा प्रवक्ते श्री किरणभाऊ मदने, जिल्हा कार्याध्यक्ष श्री अनिलभाऊ बिडे, जिल्हा संघटक श्री बाबासाहेब बिडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजयभाऊ सोनवणे, कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री दिलीप जाधव व श्री मनोजभाऊ बिडवे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष श्री संजयभाऊ जगताप व हरिभाऊ बिडवे, राहता तालुकाध्यक्ष श्री अशोकभाऊ कोरडे व श्री प्रविणभाऊ तुपे, संगमनेर तालुकाध्यक्ष साईभक्त श्री किशोरभाऊ बिडवे व श्री बाळासाहेब वाघ, अकोले तालुकाध्यक्ष श्री महेशभाऊ भराडे व श्री अमोलभाऊ कोल्हाळ, राहुरी तालुकाध्यक्ष पत्रकार श्री अनिलभाऊ वाकचौरे, श्री रविंद्र भराडे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांचे स्वागत व आभार जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ यांनी मानले व मेळावा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मदत करावी असे आवाहन केले. नंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम पार पडून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *