के.जे.सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक कर्डिलेची आर. डी.परेड साठी निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
के. जे. सोमैया महाविद्यालयाचा विद्यार्थी विवेक कर्डिले याची 26 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन पूर्व संचलन राज्यस्तरीय शिबिरात निवड झाली असून त्याने हे शिबिर नुकतेच यशस्वीरीत्या पूर्ण केले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी येथे दिली.
यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालयाचे रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड म्हणाले की, “विवेक कर्डिले याने 28 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेऊन महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोला आहे. विवेक कर्डिले यांच्या या कामगिरीबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव एडवोकेट संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे व प्राचार्य डॉ. बी एस. यादव यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कर्डिले यास कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, डॉ. एस. के. बनसोडे व प्रा. एस. एस. नागरे यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो ओळ:- विवेक कर्डीले याची आर. डी.परेड साठी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना को.ता.एज्यु. सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, समवेत मा. प्राचार्य व इतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *