कोपरगातील बेट येथील महंत रमेशगिरी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा ४ नोव्हेंबर २०२२ रोजी संपन्न होणार:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव बेट येथील श्री काशीविश्वनाथ महादेव ट्रस्ट येथील महंत रमेशगिरी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा शुक्रवार दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी दिली आहे.
महंत रमेशगिरीजी महाराज यांचे जीवन धार्मिक कार्याला वाहिलेले असून त्यांनी राष्ट्र संत जनार्दन स्वामी यांच्या निधनानंतर कोपरगाव बेट आश्रमांची जबाबदारी सांभाळली आहे.त्यांचा कोपरगाव येथील वारसा ते समर्थपणे चालवत आहे.त्याचा अभीष्टचिंतन सोहळा आगामी ४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.


महंत रमेशगिरीजी महाराज यांचे जीवन धार्मिक कार्याला वाहिलेले असून त्यांनी राष्ट्र संत जनार्दन स्वामी यांच्या निधनानंतर कोपरगाव बेट आश्रमांची जबाबदारी सांभाळली आहे.त्यांचा कोपरगाव येथील वारसा ते समर्थपणे चालवत आहे.त्याचा अभीष्टचिंतन सोहळा आगामी ४ नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे.त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यात १ नोव्हेंबर ते ३ नोव्हेंबर रोजी ओम महामृत्युंजय यज्ञ सोहळा संपन्न होत आहे.त्याची त्याच दिवशी पूर्णाहुती संपन्न होत आहे.दि.४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अभिष्टचिंतन सोहळा,पाद्यपूजा,साधूसंतांची प्रवचन सेवा व उपस्थित भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार आशुतोष काळे, विवेकभैय्या कोल्हे, माजी जि.प.सदस्य राजेशजी परजणे, नितीनदादा कोल्हे, कोपरगाव पालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुक्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, उपनिरीक्षक भरत दाते, रोहिदास ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
सदर कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय होळकर,उपाध्यक्ष विलास कोते,अंबादास अंत्रे,त्र्यंबक पाटील आदींसह बहुसंख्य विश्वस्तानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *