पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी सुरू पात्र पदवीधरांनी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत अर्ज करावेत:- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे…

Uncategorized

(शिर्डी):- भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी येत्या एक ऑक्टोबरपासून सुरु होणार असून ७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरून देता येणार आहे. अर्हता दिनांक १ नोव्हेंबर, २०२२ च्या तीन वर्षापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या म्हणजे १ नोव्हेंबर २०१९ पूर्वीच्या सर्व पदवीधरांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे. याकरीता विहीत नमुन्यातील फॉर्म क्र. १८ भरून द्यावा, असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.
मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्वीकारण्यासाठी कक्षाची स्थापन
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारास आपला आधार क्रमांक मतदार नोंदणी अर्जात नमूद करता येईल. तथापि, आधार क्रमांक सादर करणे हे ऐच्छिक आहे. शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच कोपरगांव, राहाता तहसील कार्यालयात मतदार नोंदणी अर्ज नमुना १८ स्वीकारण्यासाठी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. याच कार्यालयातून नमुना १८ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही श्री.शिंदे यांनी सांगितले.
पात्र नागरिकांनी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका इ. कार्यालयातील कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या पात्र पदवीधर अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून फॉर्म नं.१८ भरुन घ्यावेत व स्वत;चा स्वच्छ पार्श्वभूमी असलेला सुस्पष्ट फोटो, पदवी प्रमाणपत्राच्या छायाप्रतीची स्व-साक्षांकित व पदनिर्देशित अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांकडून साक्षांकित केलेली प्रत आवश्यक आहे. इतर आवश्यक साक्षांकित कागदपत्रांसह अर्ज शिर्डी उपविभागीय अधिकारी कार्यालय, किंवा कोपरगाव, राहाता तहसीलदार, मंडलाधिकारी कार्यालयात जमा करावेत. असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे यांचेकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *